बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार, खिलाडीप्रमाणे बॉलिवुडमधील सर्वात महागडा कलाकार अशी त्याची ओळख आहे. नुकताच त्याचा ‘सेल्फी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकला नाही. अभिनेता अक्षय कुमार त्याच्या हजरजबाबीपणाचा ओळखला जातो. नुकताच तो कपिल शर्माच्या कार्यक्रमात येऊन गेला होता. तिथे त्याने दिशा पटानीची खिल्ली उडवली.
कपिल शर्माच्या कार्यक्रमात बॉलिवूडचे काळजात आवर्जून उपस्थित होत असतात. नुकतीच या कार्यक्रमात अक्षय कुमारसह दिशा पटानी, नोरा फतेही, मौनी रॉय यांनी हजेरी लावली होती. तेव्हा अक्षयने त्याच्या विनोदी शैलीत अभिनेत्रींची खिल्ली उडवली. अक्षयने मौनी रॉयवर निशाणा साधत म्हणाला, “मौनीचे नुकतेच लग्न झाले आहे. तिला याचे टेन्शन आलं आहे की हिने जरी नागिणीची भूमिका साकारली असली तरी हिच्या नवऱ्याला सगळेजण बीन भेट म्हणून देतात.”
‘पठाण’ची यशस्वी घोडदौड सुरूच; मोडणार ‘बाहुबली २’ चा रेकॉर्ड? आतापर्यंत कमावले ‘इतके’ कोटी
अक्षयने पुढे आपला मोर्चा दिशाकडे वळवला तो असं म्हणाला, “दिशाला फिरण्याची आवड आहे तिला याच टेन्शन आलं आहे की जंगल सफारीला गेले आणि चुकून एका वाघाच्या तावडीत सापडले तर,” अक्षय कुमारच्या विनोदावर प्रेक्षक हसले मात्र दिशाला अवघडल्यासारखे झाले होते. दिशा व टायगर हे दोघे एकमेकांना डेट करत होते मात्र त्यांनी कधीच आपल्या नात्याबद्दल खुलासा केला नाही मात्र आता ते दोघे मित्र असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ २४ फेब्रुवारीला ‘प्रदर्शित झाला आहे. यांच्याबरोबरच नुशरत भरूचा, डायना पेंटि या अभिनेत्रीसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तसेच अक्षय आता ‘हेराफेरी ३’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटांवर काम करत आहे.