Bigg Boss 18 Update : ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व संपल्यापासून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची चर्चा सुरू आहे. ‘बिग बॉस’चं १८वं पर्व कधी सुरू होणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच अनेक चर्चा रंगल्या आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व सलमान खान ऐवजी अनिल कपूर यांनी होस्ट केलं होतं. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचं होस्टिंग सलमान खान ( Salman Khan ) करणार की नाही? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तसंच ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेला ‘बिग बॉस १८’साठी विचारणा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
आजवरच्या करिअरमध्ये बॉलीवूडच्या भाईजानने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. ज्यामध्ये सलमानचं ( Salman Khan ) ऐश्वर्या राय-बच्चन बरोबर असलेलं रिलेशनशिप अधिक चर्चेत आलं. याशिवाय संगीता बिजलानी आणि सोमी अलीबरोबरचं सलमानचं रिलेशन देखील तितकंच हाइलाइट झालं होतं. या तीनपैकी सलमान खानची एक एक्स गर्लफ्रेंड ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सलमानची ही एक्स गर्लफ्रेंड आहे सोमी अली.
या चर्चांबाबत अभिनेत्री सोमी अलीने स्वतः भाष्य करत यामागच्या सत्याचा खुलासा केला आहे. ‘आयएएनएस’बरोबर संवाद साधताना सोमी म्हणाली की, मी आपली एनजीओ सोडून अशा शोमध्ये सहभागी होऊ शकत नाही. याचं चित्रीकरण देखील खूप मोठं असतं. मी या शोच्या प्रति सन्मान ठेवून सांगते की, मी आतापर्यंत ‘बिग बॉस’चा एकही भाग पाहिलेला नाही आणि मला नाही माहित यामध्ये काय-काय होतं.”
पुढे सोमी म्हणाली, “‘बिग बॉस’ शो स्क्रिप्टेड असतो, हे मी ऐकलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मी या शोमध्ये सहभागी होतं असल्याची चर्चा आहे. पण या शोसंबंधित कुठल्याही व्यक्तीबरोबर माझा संपर्क झालेला नाही. तसंच मी स्क्रिप्टेड असलेल्या शोबाबत विचार देखील करणार नाही. जरी त्यांनी माझ्याशी कितीही संपर्क केला तरीही मी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार नाही. त्यामुळे ही फक्त अफवा असून टीआरपी रेटिंग वाढवण्यासाठी केलेली रणनीती आहे. वाहिन्या नेहमी असंच करतात.”
दरम्यान, अभिनेत्री सोमी अलीने बॉलीवूडमध्ये ‘में यार गद्दार’, ‘अंत’, ‘आओ प्यार करें’ आणि ‘चुप’ यांसारखे चित्रपट केले होते. सलमान खानबरोबरच्या रिलेशनशिपमुळे सोमी अधिक प्रसिद्धीच्या झोतात आली होती. सोमीची डिस्कवरी प्लसवरील डॉक्युसीरिज ‘फाइट ऑफ फ्लाइट २०२१’ ही सर्वात चर्चेत असणाऱ्या सीरिजपैंकी एक होती.