मराठमोळी प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ताने आजवर अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. प्राजक्ताचा चाहता वर्गही मोठा आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा नेहमीच प्रयत्न करताना दिसते. प्रोजेक्ट व वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेकदा ती सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच प्राजक्तराज या तिच्या ज्वेलरी ब्रॅण्डची घोषणा केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्राजक्ताच्या ज्वेलरी ब्रॅण्डच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते. सोने व चांदीचे दागिने प्राजक्तराजच्या खास कलेक्शनमध्ये आहेत. नुकतंच प्राजक्ताने ब्रह्मपुरी महोत्सावाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. या महोत्सवातील काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

हेही वाचा>> आलिया-रणबीरच्या लेकीबाबत तज्ञांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले…

हेही वाचा>> “माझं अभिनेत्रीबरोबर…”, ‘बिग बॉस मराठी’ फेम प्रसाद जवादेचा लग्नाबाबत मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदही ब्रह्मपुरी महोत्सावाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होता. प्राजक्ताने या सोहळ्यासाठी खास हिरव्या रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. साडीवर मॅंचिग ज्वेलरीही तिने घातली होती. प्राजक्ताच्या ज्वेलरीचं सोनू सूदने कौतुक केल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. “ब्रम्हपुरी महोत्सव…“प्राजक्तराज” विषयी महोत्सवाइतकं बोललं गेलं की मी भारावून गेले. खूप आभार. ठरवून टाकलं…‘प्राजक्तराज’चं पहिलं प्रदर्शन विदर्भात लागणार…“भद्रावती”. By the way…सोनू सूद ही म्हणाले, “गळ्यातलं unique आहे..” अर्थातच ‘प्राजक्ताराज’ची ‘वज्रटिक’ परिधान केली होती..”, अशी पोस्ट तिने केली आहे.

हेही वाचा>>“आदिलला प्रसिद्धी मिळाल्यावर…”, राखी सावंतच्या लग्नाबाबत वकिलाची प्रतिक्रिया

प्राजक्ता माळीने केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. तिचे सोनू सूदबरोबरचे फोटो व्हायरल होत आहेत. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor sonu sood praises prajakta mali jewellery kak