Celebrity MasterChef: ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार विविध पदार्थ बनवताना दिसत आहेत. नुकतंच ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये पहिलं एविक्शन पार पडलं. यामध्ये कपिल शर्मा शोमधून घराघरात पोहोचलेला कॉमेडियन चंदन प्रभाकर एविक्ट झाला. एविक्शन चॅलेंजमध्ये तेजस्वी प्रकाशने चंदनला हरवलं. त्यामुळे चंदनला ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाबाहेर जावं लागलं. पण, चंदनच्या एविक्शननंतर कार्यक्रमात आता वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये सहभाग घेतला आहे.
गेल्या आठवड्यात ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमात प्रेक्षकांना खूप ड्रामा पाहायला मिळाला. किचनमध्ये सतत स्पर्धकांमध्ये वाद झाले. तसंच दोन टीममध्ये जबरदस्त टास्क झाला. या टास्कनंतर गौरव खन्ना आणि निक्की तांबोळी स्वतःला एविक्शनपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. अखेर तेजस्वी प्रकाश आणि चंदन प्रभाकर असुरक्षित झाले. त्यामधून चंदन एविक्ट झाला. पण, लगेच ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये ९०च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटात काम करणारी आयेशा झुलकाची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. याचा प्रोमो सध्या व्हायरल होतं आहे.
या प्रोमोमध्ये आयेशा झुलकाची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळत आहे. यावेळी आयेशाला रणवीर बरार आणि विकास खन्ना विचारतात की, बाहेरून कार्यक्रम बघण्यात आणि इथे येऊन पदार्थ बनवण्यात काय फरक आहे? तेव्हा आयेशा झुलका म्हणते, “खरं सांगायचं झालं तर याचं उत्तर द्यायलाही मी खूप घाबरले आहे.”
Next week promo and new wildcard entry 90s bollywood actress #AyeshaJhulka #CelebrityMasterChef #TejasswiPrakash #TejaTroops #SonyEntertainmentTelevision #MasterChefIndia pic.twitter.com/TC7N87BH7V
— Charu Shah (@ItsCharuShah) February 8, 2025
दरम्यान, आयेशा झुलकाने १९९० मध्ये दक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनबरोबर एका तेलुगू चित्रपटातून पदार्पण केलं होतं. आयेशाने तिच्या कारकिर्दीतील पहिला हिंदी चित्रपट सलमान खानबरोबर केला. दोघेही ‘कुर्बान’ चित्रपटात एकत्र दिसले होते. आयेशाने आजवरच्या २० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत तिने आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार यांसारख्या अनेक सुपरस्टार्सबरोबर काम केलं आहे. आता मोठ्या पडद्यानंतर आयेशा छोट्या पडद्यावर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमात लोकप्रिय दिग्दर्शिका, निर्माती फराह खान, रणवीर बरार आणि विकास खन्ना परीक्षकाची धुरा सांभाळत आहेत. यामध्ये तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कड, गौरव खन्ना, उषा नाडकर्णी, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, मिस्टर फैजू, अर्चना गौतम, राजीव अदातिया आणि कबिता सिंग हे स्पर्धक राहिले आहेत.