अभिनेत्री नोरा फतेही आपल्या नृत्य कौश्यल्याने चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे आज जगभरात चाहते आहेत. बॉलिवूडच्या अनेक गाण्यात ती थिरकताना दिसून आली आहे. बॉलिवूडमध्ये तिने आज तिचे स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नोराने नुकताच सह कलाकाराबरोबर काम करताना आलेल्या अनुभवाचा खुलासा केला आहे.
नोरा फतेही डान्सच्याबरोबरीने तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. नुकतीच तिने कपिल शर्माच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ज्यात तिने हा प्रसंग सांगितला आहे. ती असं म्हणाली, “आम्ही बांगलादेशमध्ये सुंदरबनच्या जंगलात चित्रीकरण करत होतो. माझा सह कलाकार खूपच असंस्कृत होता. म्हणून मी त्याच्या कानशिलात लगावली. हे सांगताना तिला हसू अनावर झाले नाही. ती पुढे म्हणाली, मी पुन्हा त्याच्या कानशिलात लगावली, त्याने माझे केस ओढले मी ही त्याचे केस ओढले अखेर दिग्दर्शकाने मध्यस्थी केली.”
“माझे नातेवाईक…” ‘बिग बॉस’ विजेत्या अक्षयबरोबरच्या नात्यावर समृद्धी केळकरने सोडलं मौन
नोराने नुकताच तिचा वाढदिवस दुबईमध्ये साजरा केला आहे. तिने आपल्या मित्रमंडळींबरोबर एका यॉटवर वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. नोरा मूळची कॅनडाची असून बॉलिवूडमध्ये संघर्ष केला आहे. आज ती कोट्यवधींची मालकीण आहे.
नोरा सध्या अक्षय कुमारबरोबर अमेरिकेत कॉन्सर्टसाठी जाणार आहे, तसेच अभिनेत्री दिशा पटानी, मौनी रॉय यांचाही समावेश आहे. नोरा आता साजिद खानच्या ‘१०० पर्सेंट’ या चित्रपटात दिसणार आहे.