बॉलीवूड अभिनेता गोविंदाची भाची, हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंह सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. २५ एप्रिलला तिचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. व्यावसायिक दीपक चौहानबरोबर आरतीने लग्नगाठ बांधली. भाचीच्या लग्नाला गोविंदा हजर राहणार की नाही? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण जुने वाद विसरून गोविंदाने आपल्या भाचीचा लग्नाला खास उपस्थिती लावली. यावेळी गोविंदाचा मुलगा देखील पाहायला मिळाला.

आता आरतीच्या लग्नाला महिना पूर्ण झाला आहे. लग्नानंतर आरती नवऱ्याबरोबर पहिल्यांदा काश्मीरला हनिमूनला गेली होती. त्यानंतर आता आरती आणि दीपक पॅरिसला हनिमूनला गेले आहेत. दोघांचे पॅरिसमधली हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अशातच आरतीने ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे; जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Reshma Shinde Wedding Video writes special kannda msg
Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेसेज, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…
deepika padukone visited diljit dosanjh concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणने घेतली एन्ट्री; व्हायरल व्हिडीओमध्ये गाण्यांवर थिरकताना दिसली अभिनेत्री

हेही वाचा – मुनव्वर फारुकीने दुसऱ्या लग्नावर केलं शिक्कामोर्तब, पत्नी व मुलांसह केली पिझ्झा पार्टी, फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या ‘अंगारों’ या गाण्याने अक्षरशः सगळ्यांना वेड लावलं आहे. अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणारा ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे गाणी देखील सहा भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आली असून सगळ्या भाषांमध्ये ट्रेंड होतं आहेत. पण सध्या हिंदीतील ‘अंगारों’ गाण्याने धुमाकूळ घातला आहे. याच गाण्यावर आरती सिंहने हटके डान्स केला आहे.

“ट्रेंडिंग”, असं लिहित आरतीने हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत समुद्रातील बोटीवर आरती ‘अंगारों’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिनं मूळ गाण्यातील अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाने केलेल्या हूकस्टेप केली आहे.

आरतीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. “ज्याप्रमाणे तुझ्या मागच्या व्यक्तीने तुला दुर्लक्ष केलं त्याप्रमाणेच मीही दुर्लक्ष केलं”, “लग्नापासून ते आतापर्यंत ही डान्सचं करत आहे”, “हिला डान्स करण्याशिवाय दुसरं कामच नाही”, अशा अनेक खटकणाऱ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. पण काही नेटकऱ्यांनी आरतीची बाजू घेत तिचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – तू भेटशी नव्याने : शिवानी सोनारने नवी मालिका सुरू होण्यापूर्वी सुबोध भावेला दिली खास भेटवस्तू, म्हणाली, “सुरुवात गोड तर…”

दरम्यान, आरती सिंहच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘मायका’, ‘गृहस्थी’, ‘उतरन’, ‘ससुराल सिमर का’, ‘उड़ान’ या मालिकांमध्ये ही ३९ वर्षांची अभिनेत्री झळकली होती. ‘बिग बॉस’च्या १३व्या पर्वामुळे आरती अधिक प्रसिद्ध झोतात आली आणि तिची लोकप्रियता आणखी वाढली.

Story img Loader