सध्या सोशल मीडियावर एका घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये शूटिंग सुरू असताना अचानक सेट पडताना दिसत आहे. पण ही धक्कादायक घटना एका प्रसिद्ध गायिकेबरोबर घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका तुलसी कुमार हिच्याबरोबर ही घटना घडली आहे. तुलसी कुमारबरोबर घडलेली ही घटना पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत. पण या घटनेतून तुलसी बालबाल बचावली आहे.

हेही वाचा –Bigg Boss 18 : पहिल्या नॉमिनेशन टास्कमध्ये झाला राडा, गुणरत्न सदावर्ते झाले टार्गेट; म्हणाले, “डंके की चोट पे…”

‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर तुलसी कुमारबरोबर घडलेल्या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका म्युझिक व्हिडीओचं शूटिंग करत असल्याचं समोर आलं आले. सुरुवातीला तुलसी मोबाइलमध्ये बघत-बघत पुढे येते. त्यानंतर तिला थांबायला सांगितलं जात. यावेळी ती फ्रंट लूक देऊन अभिनय करत असते तितक्यात सेट पडतो. पण एक व्यक्ती पटकन धावत पुढे येते आणि यामुळे तुलसी थोडक्यात वाचते. तरीही पुढे व्हिडीओमध्ये तुलसीला वेदना होताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – सूरज चव्हाण जिंकल्यावर केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे अभिनेता झाला ट्रोल, म्हणाला, “आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांनी आधी…”

हेही वाचा – “तुझी लायकी किती, उंची किती…”, पंढरीनाथ कांबळेवर टीका करताना अभिजीत बिचुकलेंची जीभ घसरली; म्हणाले, “ज्याला गेली २५ वर्ष…”

तुलसीबरोबर घडलेल्या घटनेचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एका चाहत्याने लिहिलं आहे, “थोडक्यात वाचली. नाहीतर जास्त जखमी झाली असती.” तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलं की, ती सुखरुप असेल, अशी आशा आहे. तसंच काही चाहत्यांनी ती लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

हेही वाचा – आलिया भट्टच्या लाडक्या लेकीला आवडतं ‘नाटू-नाटू’ गाणं, आईबरोबर ‘अशी’ नाचते, पाहा व्हिडीओ

तुलसी कुमार कोण आहे?

प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार आणि सुदेश कुमारी यांची मुलगी तुलसी कुमार आहे. भूषण कुमारची ती बहीण आहे. वडिलांप्रमाणे तुलसी प्रसिद्ध गायिका आहे. २००९मध्ये तिने ‘लव्ह हो जाए’ या अल्बममधून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘हमको दीवाना कर गए’, ‘मेरे रश्के कमर’, ‘पी लूं’, ‘तुम जो आए जिंदगी में’, ‘हम मर जाएंगे’, ‘ओ साकी साकी’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी तुलसीने गायली आहेत. तिच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood singer tulsi kumar injured during a mishap on the set video viral pps