सध्या बॉलिवूडमध्ये दोन चित्रपटांची हवा आहे अक्षय कुमारचा ‘रामसेतू’ तर अजय देवगांचा ‘थँक गॉड’ हे दोन चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहेत. अजयच्या ‘थँक गॉड’ चित्रपटातील कलाकार नुकतेच कपिल शर्माच्या कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान मजा मस्ती तर झालीच त्याचबरोबरीने कपिलने अजय देवगणला काही प्रश्न विचारले त्यावरून अजय देवगणने हुशारीने उत्तर दिले.
कपिलने अजयला विचारले ‘तू हा चित्रपट पैसे कमावण्यासाठी केलास की राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यासाठी’? अजयने शिताफीने हा प्रश्न चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्रकुमार यांच्याकडे फिरवला. अजयनंतर कपिलने आपला मोर्चा रकुल प्रीतकडे वळवला तिला विचारले, ‘जसं दिवाळीत तुम्हाला प्रत्येक मिठाईच्या दुकानात काजू कतली नक्कीच मिळेल, प्रत्येक मोठ्या हिंदी चित्रपटाप्रमाणेच तुम्हाला रकुल प्रीत नक्कीच मिळेल’. त्याच्या या वाक्यावर रकुलच्या बरोबरीने सर्वचजण हसायला लागले.
या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली गेली.काही लोकांनी चित्रगुप्ताच्या नावाच्या वापरावर आक्षेप घेतला आहे. आता चित्रगुप्त’ या व्यक्तिरेखेचे नाव बदलून ‘सीजी’, तर ‘यमदूत’ या व्यक्तीरेखेचे नाव बदलून ‘वायडी’ असे करण्यात येणार आहे.
‘मस्ती’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती, ‘धमाल’सारख्या विनोदी चित्रपटांच्या सीरिजनंतर पुन्हा एकदा इंद्र कुमार अशीच एक विनोदी कथा घेऊन आले आहेत. २५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट एक पर्वणी ठरेल.