अभिनेत्री केतकी चितळे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर अधिक सक्रीय असून तिथे ती प्रत्येक मुद्द्यावर आपली मत मांडत असते. गेल्यावर्षी केतकी एका आक्षेपार्ह पोस्टमुळे अडचणीत सापडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत तिनं पोस्ट केली होती. या आक्षेपार्ह पोस्टमुळे तिला ४१ दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता. आता याच तुरुंगवासाच्या प्रवासावर केतकी चितळेनं एक पुस्तक लिहिलं आहे. केतकीचं हे पुस्तक पुढच्या वर्षी प्रकाशित होणार आहे. याबाबतची माहिती तिनं स्वतः इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.
हेही वाचा – Lust Stories 2 Review: दमदार आणि शानदार! मानवी मनाचे अंतरंग उलगडणारा सिनेमा
काल रात्री केतकीनं वेगवेगळ्या मुद्द्यांविषयी बोलण्यासाठी इन्स्टाग्राम लाईव्ह केलं होत. यामध्ये मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी करा, मतदान करा. युसीसीबाबत तुमचं मत मांडा. एपिलेप्सी कम्युनिटीमध्ये असलेला आकाश दीक्षित हा कशाप्रकारे फसवणूक करत आहे, अशा अनेक मुद्द्यांवर केतकी इन्स्टाग्रामवर लाईव्हवर बोलत होती. याच वेळी तिनं एका चाहत्याला उत्तर देताना पुढच्या वर्षीय आपल्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित होणार असल्याचं सांगितलं.
हेही वाचा – Video : शहरातील पावसाचा आनंद न घेता मराठी अभिनेत्रीने गावी केली शेती, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
एका चाहत्यानं तिला विचारलं होतं की, “तुमची स्टोरी?” यावर उत्तर देताना केतकी म्हणाली की, “पुढच्या वर्षी माझं पुस्तक प्रकाशित होतंय. तर जरुर विकत घ्या. तुम्हाला माझं संपूर्ण आयुष्य नाही, पण तुरुंगात जायचा प्रवास आणि का? याच्या मागील कारण कळेल. पुढच्या वर्षी ते पुस्तक प्रकाशित होतंय. माझ्याबाबतीत नेमकं काय घडलं होतं? यावर पुस्तकात लिहिण्यात आलेलं आहे. कृपया, जेव्हा पुस्तक प्रकाशित होईल तेव्हा जरूर विकत घ्या.”
हेही वाचा – राम चरणच्या लेकीचं बारसं थाटामाटात संपन्न, ठेवलं हटके नाव, अर्थ आहे खूपच खास
केतकी चितळे सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती प्रसिद्ध आहे. स्टार प्रवाहवरील ‘आंबट गोड’, झी मराठीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या लोकप्रिय मालिकांमध्ये केतकीनं काम केलं होतं. शिवाय तिनं हिंदीमधील सोनी टीव्हीवरील ‘सास बिना सुसराल’ या मालिकेतही काम केलं होतं.