चित्रपट प्रदर्शनाची तारीख जवळ आली की बॉलिवूड स्टार्स सर्वतोपरी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी ते विविध शहरांमध्ये जाऊन अनेक कार्यक्रमांना उपास्थित राहतात. त्याचप्रमाणे अनेक मालिका, रिअॅलिटी शोमध्येही हजेरी लावत ते आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करतात. ‘द कपिल शर्मा शो’ हा हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक आघाडीचा कार्यक्रम आहे जिथे बॉलिवूड स्टार्स आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कपिल शर्मा त्याच्या या कार्यक्रमामुळे बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे. नुकतंच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील एका अभिनेत्याने कपिल शर्माच्या टीमवर आरोप केले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत या अभिनेत्याने कपिलला जाब विचारला आहे. कपिल शर्मा शोमध्ये नुकतंच रणबीर कपूरने हजेरी लावली. रणबीर या कार्यक्रमात त्याच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आला होता.

आणखी वाचा : ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाला मिळालं जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग; पहिल्या दिवशी कमावणार ‘इतके’ कोटी

यावेळी या कार्यक्रमातील ‘पोस्ट का पोस्टमार्टम’ या सेगमेंट दरम्यान रणबीर आणि अभिनेता सौरव गुर्जर यांच्या एका फोटोखालील मजेशीर कॉमेंट सगळ्यांसमोर वाचण्यात आल्या. या फोटोमध्ये रणबीर सौरवच्या खांद्यावर बसला आहे. या पोस्ट खालील कॉमेंट खोट्या असल्याच्या आरोप सौरवने केला आहे. याचा व्हिडिओदेखील त्याने शेअर केला आहे.

आपल्या ट्विटर पोस्टमध्ये व्हिडिओ शेअर करत सौरव म्हणतो, “कपिल शर्मा तू एक चांगला माणूस आहेस, लोकांना हसवतोस, पण तू आणि तुझी संपूर्ण टीम या कोणाच्या तरी सोशल मीडिया वरच्या या खोट्या कॉमेंट कशा काय दाखवू शकता? हे मान्य न करण्यासारखं आहे.” सौरवनं शेअर केलेल्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. सौरवने रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात जोर ही खलनायकाची भूमिका निभावली होती.