पडद्यावर दिसणाऱ्या कलाकृतींबरोबर पडद्यामागे काय घडते, याबद्दल प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. मालिकेत, चित्रपटांत जसे दिसते, तसेच नाते त्यांच्यात असते का, शूटिंग दरम्यान ते काय गमती जमती करतात, हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचे असते. अनेक दिग्गज कलाकार मुलाखतींदरम्यान शूटिंगदरम्यानचे अनेक किस्से सांगतात. आता सोशल मीडियामुळे चित्रपट, मालिकांच्या सेटवरील अनेक गोष्टी पाहायला मिळतात. आता झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी सावळ्याची जणू सावली (Savlyachi Janu Savli) या मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मालिकेतील कलाकार मजा-मस्ती करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कलाकारांचा कोंबडी पळाली गाण्यावर भन्नाट डान्स

कोठारे व्हिजनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सारंग, सावली, सारंगचा भाऊ, सावलीचा भाऊ, आई, वहिनी, भाऊ, वडील असे सगळे दिसत आहेत. ते सीनच्या शूटिंगसाठी एकत्र जमल्याचे दिसत आहे. यादरम्यान, कोंबळी पळाली हे गाणे ऐकल्यानंतर ते सगळे जण त्यावर डान्स करताना दिसत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कोठारे व्हिजनने, ‘जेव्हा शूटच्या मधे सेटवर अचानक कोंबडी पळाली गाणं वाजतं, अशी कॅप्शन दिली आहे. पुढे पडद्यामागचे क्षण असेही लिहिल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत कलाकारांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने, “तुम्ही किती मजा करता “, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “मस्त”, तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “बेस्ट मालिका”.

हेही वाचा: धर्मासाठी बॉलीवूड सोडणारी सना खान दुसऱ्यांदा झाली आई, दीड वर्षांचा आहे पहिला मुलगा

‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकरने सावलीची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता साईंकित कामतने सारंगची भूमिका साकारली आहे. सावली आपल्या विनम्र स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. कितीही संकटे आली तरीही संयमाने त्याला सामोरी जाताना दिसते. कोणत्याही परिस्थितीत तिच्या कुटुंबाला त्रास होऊ नये याची ती काळजी घेताना दिसते. गरीब घरातील, सावळ्या रंगाच्या मुलीचे श्रीमंत असणाऱ्या व सौंदर्याला अतिमहत्त्व असणाऱ्या घरातील सारंगबरोबर लग्न झाले आहे. हे लग्न दोघांच्याही मर्जीविरुद्ध झाले आहे. सारंगचे अस्मीवर प्रेम होते; मात्र जगन्नाथने बदला घेण्यासाठी सावली व सारंगचे लग्न लावून दिले

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bts of savlyachi janu savli marathi serial dance on kombdi palali song watch video nsp