छोट्या पडद्यावरील म्हणजेच टीव्हीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत लाडक्या असतात. मात्र, एखाद्या सीनचे कसे शूटिंग होत असेल? शूटिंग करताना काय गमती-जमती घडत असतील? याबद्दल प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. आता सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचताना दिसतात. अनेकदा प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेचे पडद्यामागील क्षण पाहण्यास मिळतात. आता शिवा (Shiva) मालिकेतील एका सीनच्या शूटिंगचा व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘शिवा’ मालिकेतील सीनचा BTS व्हिडीओ

‘शिवा’ मालिकेत सध्या आशू व शिवा यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून आशू व शिवा घरापासून दोघेच वेगळे राहत आहेत. आशूच्या मनातील शिवाविषयीचे गैरसमज दूर झाल्यानंतर त्याने सगळ्यांसमोर तिच्याविषयीचे प्रेम व्यक्त केले. मात्र, त्याच्या आईने सिताईने शिवाला सून म्हणून घरात घेण्यास नकार दिला. आईचे मत ऐकल्यानंतर शिवाची साथ न सोडता त्याने तिच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. आशूने कंपनीतूनही बाहेर पडत स्वत:च्या हिमतीवर नोकरी मिळवण्याचा निर्धार केला आहे. त्याला शिवा वेळोवेळी साथ देताना दिसत आहे. दिव्या अजूनही कारस्थान करीत असल्याचे दिसत आहे. आशू व शिवामध्ये दुरावा निर्माण व्हावा, यासाठी ती सतत काही ना काही करताना दिसते. या सगळ्यात आशू व शिवा यांच्यातील प्रेम वाढताना दिसत आहे. त्यांच्यातील जवळीक वाढताना पाहायला मिळत आहे. आता हा रोमँटिक सीन कसा शूट केला, याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

मारुती देसाईंनी शिवा मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सेटवर शूटिंग सुरू असल्याचे दिसते. अॅक्शन असे म्हटल्यानंतर शिवा व आशू कॅमेरामध्ये दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की संपूर्ण सेट सजवला आहे. फुले, फुगे यांनी सजावट केल्याचे दिसत आहे. एका ठिकाणी लव्ह यू असेही लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. पुढे आशू शिवाचा रोमँटिक सीन शूट होत असल्याचे दिसत आहे. तसेच सेटवर मजा मस्ती चालू असलेली पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आता शिवा मालिकेत पुढे काय ट्विस्ट येणार, दिव्या तिच्या कारस्थानात यशस्वी होणार का, आशू नोकरी मिळवू शकणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.