Bigg Boss: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’कडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस’ हे परदेशातील ‘बिग ब्रदर’ या शोवर आधारित आहे. सुरुवातीला हिंदीमध्ये सुरू झालेलं ‘बिग बॉस’ आता कन्नड, बंगाली, तमिळ, तेलुगू, मराठी आणि मल्याळमसह सात भाषांमध्ये पाहायला मिळतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदी ‘बिग बॉस’चे आतापर्यंत १७ पर्व झाले आहेत. सध्या ‘बिग बॉस’चं १८वं पर्व सुरू आहे. या पर्वालादेखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. आतापर्यंत राहूल रॉय, आशुतोष कौशिक, विंदू सिंह, श्वेता तिवारी, जुही परमार, उर्वशी ढोलकिया, गौहर खान, गौतम गुलाटी, प्रिन्स नरुला, मनवीर गुजर, शिल्पा शिंदे, दीपिका कक्कर, सिद्धार्थ शुक्ला, रुबिना दिलैक, तेजस्वी प्रकाश आणि एमसी स्टॅन यांनी हिंदी ‘बिग बॉस’ जिंकलं आहे. ‘बिग बॉसम’मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी मोठी रक्कम मोजली जाते. पण, एक असा स्पर्धक आहे, ज्याच्या तीन दिवसांसाठी अडीच लाख रुपये मोजले होते.

हेही वाचा – Video: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड झाला सावंतवाडीचा जावई, लग्नाचा पूर्ण व्हिडीओ आला समोर; म्हणाला, “प्रपोज नाही थेट लग्नाची घातलेली मागणी…”

आतापर्यंतच्या ‘बिग बॉस’मध्ये अनेक मोठे कलाकार येऊन गेले आहेत. मग सिद्धार्थ शुक्ला असो, हिना खान असो किंवा सध्या सुरू असलेल्या १८व्या पर्वातील विवियन डिसेना असो. प्रत्येकाने भलंमोठं मानधन घेतलं आहे. पण यांच्यापैकी कोणीही तीन दिवसांसाठी अडीच लाख रुपये घेतले नव्हते.

हेही वाचा – Video: जान्हवी किल्लेकर, घन:श्याम दरवडेचा ‘पुष्पा २’मधील ‘अंगारों’ गाण्यावरील मजेशीर रील पाहिलंत का? नेटकरी म्हणाले…

‘फायन्शियल एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, कॅनडा-अमेरिकेची अभिनेत्री पामेला एंडरसनने ‘बिग बॉस’मध्ये येण्यासाठी सर्वाधिक मानधन घेतलं होतं. पामेला ही ‘बिग बॉस’च्या इतिसाहातील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे. तिला तीन दिवसांसाठी अडीच लाख रुपये मानधन दिलं होतं. ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात पामेला एंडरसन झळकली होती. या पर्वात सलमान खान पहिल्यांदाच होस्ट म्हणून पाहायला मिळाला होता.

हेही वाचा – Bigg Boss 18: विवियन डिसेना, करणवीर मेहरा नाही तर ‘हा’ सदस्य झाला नवा ‘टाइम गॉड’; दोन आठवडे नॉमिनेशनपासून राहणार सुरक्षित

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाची विजेती श्वेता तिवारी ठरली होती. या पर्वात ग्रेट खली, डॉली बिंद्रा आणि समीर सोनी पाहायला मिळाले होते. या पर्वातील द ग्रेट खलीने एका आठवड्यासाठी ५० लाख मानधन घेतलं होतं. तर करणवीर बोहराला एका आठवड्यासाठी २० लाख, सिद्धार्थ शुक्लाला ९ लाख, हिना खानला २ लाख आणि विवियन डिसेनाला ५ लाख मोजले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canadian american actor pamela anderson was the highest paid contestant in the history of bigg boss earning 2 5 crore for 3 days pps