अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाले आहे, तिने शुक्रवारी (२८ जून) सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. तिने पोस्ट शेअर केल्यावर इंडस्ट्रीतील कलाकार व तिचे मित्र-मैत्रिणी तिला धीर देत आहेत. तिच्याबद्दल अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. कर्करोगावर मात करणारी बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिनेही हिनाच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “मला तिसऱ्या टप्प्यातील स्तनांचा कर्करोग असल्याचं निदान झालं आहे. माझ्यावर उपचार सुरु असून मी लवकरच पूर्णपणे बरी होईन. या काळात तुमची सोबत असणे गरजेचे आहे. मी तुमची काळजी, प्रेम समजू शकते पण या कठीण काळात माझ्या खासगीपणाचा आदर करावा, अशी मी चाहत्यांना विनंती करते. तुम्हाला आलेले अनुभव मला सांगू शकता, काही सल्ले द्यायचे असतील तर ते देखील शेअर करु शकता.”

‘परदेस’ फेम अभिनेत्री महिमा चौधरीला २०२२ मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. आपले उपचार पूर्ण झाल्याचा खुलासा तिने याआधी केला होता. हिना खानच्या या पोस्टवर अभिनेत्री महिमा चौधरीने तिला पाठिंबा देणारा मेसेज लिहिला आहे. “हिना तू खूप धाडसी आहेस. तू कठीण परिस्थितीबरोबर लढणारी आहेस. तू लवकरच बरी होशील. तुझ्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणारे लाखो लोक आहेत आणि तुझ्या या प्रवासात मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन. माझे तुला खूप प्रेम!” असे म्हणत महिमाने हिनाला धीर दिला आहे.

हेही वाचा : “आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…

गेल्या काही दिवसांपासून हिनाच्या प्रकृतीबाबत विविध चर्चा होत होत्या. आता हिनाने पोस्ट करत कर्करोगाचे निदान झाले असले तरी प्रकृती उत्तम असल्याचं चाहत्यांना सांगितलं. तसेच उपचार सुरू असल्याची माहितीही तिने दिली. सध्या मी माझ्या जवळच्या लोकांबरोबर असून मी यातून लवकरच बाहेर पडेन, लवकरच बरी होईन. असं तिने या पोस्टमधून सांगितलं.

अभिनेत्रीने तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिल्यानंतर तिचे चाहते काळजी व्यक्त करत आहेत. याबरोबरच, ‘तू वाघीण आहेस’, ‘तू विचार करतेस त्यापेक्षा जास्त मजबूत आहेस’, ‘ तू काही काळजी करु नकोस, तू लवकरच बरी होशील’ अशा आशयाच्या कमेंट्स करत अनेक चाहत्यांनी तिला धीर दिला आहे. सोशल मीडिया पोस्टवर तिचे इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणी कमेंट्स करून तिला काळजी घेण्यास सांगत आहेत. हिनाच्या पोस्टवर सयंतनी घोष, लता सभरवाल, हेली शाह, रश्मी देसाई, शार्दुल पंडित, रोहन मेहरा, पायल गौर, आश्का गोराडिया, उदय टिकेकर यांनी कमेंट्स केल्या आहेत

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancer survivor bollywood actress mahima chaudhry supports hina khan after diagnosed with stage three breast cancer nsp