लोकप्रिय रिअॅलिटी टीव्ही स्टार व ‘बिग बॉस’ फेम प्रिन्स नरुलाने चाहत्यांबरोबर एक गुड न्यूज शेअर केली आहे. प्रिन्स व त्याची अभिनेत्री पत्नी युविका चौधरी लवकरच आई-बाबा होणार आहेत. युविका गरोदर असून हे जोडपं लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. प्रिन्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे.

प्रिन्सने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक लाल जीपचा फोटो शेअर केला आहे, त्याजवळ एक छोटी खेळण्याची जीप दिसत आहे. प्रिन्सने लिहिलं, “हॅलो.. माझ्या भावना तुमच्याशी कशा शेअर कराव्यात हे मला कळत नाही, कारण आज आम्ही खूप आनंदी आहोत आणि थोडे नर्व्हसही आहोत. आम्ही देवाचे आभारी आहोत आणि लवकरच आई-बाबा होणार आहोत, त्यासाठी उत्साही आहोत. लवकरच प्रिविकाचे (प्रिन्स आणि युविका) बाळ या जगात येणार आहे. युविका मग तू माझ्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर असशील आणि माझ्या आई-वडिलांसाठी मी. कारण आपल्या आयुष्यात येणारं बाळ सर्वांची प्राथमिकता असले. तो आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू असेल, आपलं आयुष्य त्याच्याभोवती फिरणार आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण काही दिवसांनी तू नाही तर ते बाळ माझी प्राथमिकता असेल.”

Amala Paul blessed with baby boy
Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ
Richa Chadha answered to those who trolled Deepika Padukone for wearing high heels during pregnancy
“गर्भाशय नाही तर…”, दीपिका पदुकोणला ट्रोल करणाऱ्यांना रिचा चड्ढा स्पष्टच म्हणाली…
jay dudhane father passed away
“माझा सुपरहिरो गमावला…”, जय दुधाणेच्या वडिलांचं हृदय बंद पडल्याने निधन, शेअर केली भावुक पोस्ट
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल

२५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”

पुढे त्याने लिहिलं, “मी खूप आनंदी आहे की, ज्याच्यासाठी मी एवढी मेहनत केली आहे, ते सगळं मी बाबा झाल्यावर त्याच्यासाठी असेल. सर्व आई-बाबांची असतात, त्याप्रमाणे माझीही स्वप्नं होती. जसं आमच्या पालकांनी आम्हाला मोठं केलं आणि आम्हाला चांगली माणसं बनवलं, तसाच प्रयत्न आम्हीही आमच्या बाळासाठी करू.”

सोनाक्षी सिन्हाने लग्नात नेसली आईची साडी, तर रिसेप्शनच्या लाल बनारसी साडीची किंमत फक्त…

युविका गरोदर आहे हे कळालं तेव्हापासून ते आतापर्यंतच्या भावना काय होत्या, हेही प्रिन्सने पोस्टमध्ये लिहिलं. प्रिन्सच्या या पोस्टवर त्यांचे इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणी व चाहते लाइक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सर्वजण प्रिन्स व युविकाला त्यांच्या आयुष्यातील या पुढच्या टप्प्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

नवविवाहित सोनाक्षी सिन्हा व तिचा पती झहीर इक्बाल यांचे शिक्षण किती? जाणून घ्या

युविका व प्रिन्स यांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचं झाल्यास ते ‘बिग बॉस ९’मध्ये भेटले होते आणि तिथेच प्रेमात पडले. प्रिन्स युविकापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. युविका ४० वर्षांची असून प्रिन्स ३३ वर्षांचा आहे. ‘बिग बॉस’मध्ये प्रेमात पडल्यावर आणि काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी २०१८ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर सहा वर्षांनी हे दोघे आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.