Celebrity MasterChef: ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाची सध्या खूप चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कड, गौरव खन्ना, उषा नाडकर्णी, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, मिस्टर फैजू, अर्चना गौतम असे ११ कलाकार सहभागी झाले आहेत. नुकतंच या कार्यक्रमात पहिलं एविक्शन झालं. कॉमेडियन चंदन प्रभाकर एविक्ट झाला.
गेल्या आठवड्यात एविक्शनची टांगती तलवार उषा नाडकर्णी यांच्यावरदेखील होती. पण, मिस्टर फैजूने त्यांना सुरक्षित केलं. त्यामुळे त्या अजूनही ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये खेळताना दिसत आहे. सध्या दोघांच्या एका डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मिस्टर फैजू म्हणजे फैजल शेखने उषा नाडकर्णींबरोबरचा डान्स व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फैजू उषा ताईंबरोबर बादशाहचं नवीन गाणं ‘गोरी है कलाइयां’वर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत फैजूने लिहिलं आहे, “फैजू + उषा आई = फुल्ल वाइब.” फैजू आणि उषा नाडकर्णींच्या या डान्स व्हिडीओवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बऱ्याच जणांनी दोघांच्या बॉन्डचं कौतुक केलं आहे.
उषा नाडकर्णींना सुरक्षित करून फैजूने जिंकली प्रेक्षकांची मनं
गेल्या आठवड्यात फैजू आणि अभिजीत सावंतला पॉवर कार्ड मिळालं होतं. या पॉवर कार्डच्या माध्यमातून ब्लॅक एप्रनच्या चॅलेंजमध्ये असलेल्या एका कलाकाराला सुरक्षित करायचं होतं. यावेळी फैजू आणि अभिजीतने मिळून उषा नाडकर्णींना सुरक्षित करायचं ठरवलं.
पुढे फैजू उषा ताईंचं नाव घेत म्हणाला की, आम्ही उषा ताईला सुरक्षित करू इच्छितो. उषा ताई ही माझ्या आईसारखी आहे. उषा ताईंसाठी पहिल्या दिवसापासून माझ्या मनात एक हळवी जागा आहे. जर उद्या कोणी आम्हाला ब्लॅक एप्रनच्या चॅलेंजमध्ये टाकलं तर ते आम्हाला त्रास देतील. पण एका आई त्या चॅलेंजमध्ये टाकलं तर ती त्रास देणार नाही. हे ऐकून उषा नाडकर्णी भावुक झाल्या त्यांनी फैजूला जाऊन मिठी मारली. सध्या फैजूचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होतं असून त्याचं खूप कौतुक केलं जात आहे.