Celebrity Masterchef: काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमात सतत काही ना काहीतरी घडताना दिसत आहे. कधी कोणी रडताना दिसत, तर कधी दोन सदस्यांमध्ये ‘तू तू मैं मैं’ होताना पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हेतर अलीकडेच गौरव खन्ना आणि निक्की तांबोळी यांच्यात खूप मोठे वाद झाले. सध्या उषा नाडकर्णींचा एक प्रोमो खूप व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये उषा नाडकर्णींनी केलेला पदार्थ खाण्यास परीक्षक नकार देताना दिसत आहेत. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

‘सोनी लिव्ह इंडिया’ यांनी सोशल मीडियावर उषा नाडकर्णींचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये फराह खान उषा ताईंना विचारते, “काय बनवलं आहे?” तर उषा नाडकर्णी म्हणतात, “फ्राय चिकन.” मग रणवीर बरार उषा ताईंनी केलेला पदार्थ पाहतात. तेव्हा चिकन शिजलेलं नसतं. त्यामुळे उषा नाडकर्णींनी विचारतात की, काय झालं? तर फराह खान म्हणते, “चिकन पूर्णपणे शिजलेलं नाही.” त्यानंतर रणवीर बरार म्हणतात की, आम्ही खाल्लं तर आजारी पडू. तेव्हा उषा नाडकर्णी सांगतात, “मी चिकनमध्ये चाकू घसवून पाहिलं होतं, शिजलं की नाही.”

पुढे फराह खान उषा ताईंना सांगते, “जेव्हा शेफ सांगतात, तेव्हा त्यांचं ऐकायचं.” यावर उषा नाडकर्णींनी म्हणतात, “मग मला तसं बोलायला पाहिजे होतं ना?” त्यावर फराह म्हणते की, तुम्ही कधी कधी ऐकतंच नाही. त्यामुळे आता पुढे काय होतं? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

दरम्यान, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमात लोकप्रिय दिग्दर्शिका, निर्माती फराह खान, रणवीर बरार आणि विकास खन्ना परीक्षकाची धुरा सांभाळत आहे. एकूण ११ लोकप्रिय कलाकारांनी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ सहभाग घेतला आहे. तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कड, गौरव खन्ना, उषा नाडकर्णी, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, मिस्टर फैजू, अर्चना गौतम, राजीव अदातिया, चंदन प्रभाकर आणि कबिता सिंग हे ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चे स्पर्धक आहेत. माहितीनुसार, उषा नाडकर्णी यांना या कार्यक्रमासाठी प्रत्येक आठवड्याला १ लाख मानधन दिलं जात आहे.

Story img Loader