‘बिग बॉस’ मराठीचं पाचवं पर्व गाजवल्यानंतर निक्की तांबोळी आता ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये पोहचली आहे. येथे आल्यापासून निक्की कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत आहे. अशात नुकतेच या कार्यक्रमात तिने राजीव अदातियावर एक टिपण्णी केली होती. तिने केलेल्या वक्तव्याने सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निक्की तांबोळी आणि राजीव अदातिया या दोघांमध्ये संवाद सुरू असताना तिने केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असं निक्कीचं म्हणणं आहे. नेटकऱ्यांनी तिने केलेल्या वक्तव्यावरून तिच्यावर वर्णद्वेषाचा आरोप करत टीका केली आहे. मात्र, या सर्वांवर निक्की आणि राजीव दोघांनाही हसू आलं, असं तिचं म्हणणं आहे. निक्कीने यावर तिची बाजू मांडताना म्हटलं, “काही वेळा दोन मित्रांमधील मजा मस्करीच्या क्षणांना चुकीच्या पद्धतीने समजलं जातं, इथेसुद्धा अगदी असंच काहीसं झालं आहे. आम्ही नेहमीच एकमेकांची मस्करी करत असतो आणि आताही आम्ही काही वेगळं केलं नाही.”

भावना दुखावण्याचा हेतू नव्हता

“कुणाचा अपमान व्हावा अथवा एखाद्याच्या भावना दुखावल्या जाव्यात असा माझा हेतू नव्हता. सोशल मीडियावर मला ट्रोल केल्यानंतर राजीव आणि मी आम्ही दोघांनी या मुद्द्यावर एकमेकांशी चर्चा केली. आम्हाला दोघांना यावर खूप हसू आलं, कारण या गोष्टी वाढवून-चढवून सांगितल्या जात आहेत. जे घडलं त्यावेळी मी ते कोणत्या पद्धतीने बोलले हे न पाहता माझ्यावर आरोप केले जात आहेत. विविध शब्दांचा अर्थ न समजून घेणे तसेच त्यातून वाईट अर्थ काढणे हे अतिशय वाईट आहे”, असंही निक्की तांबोळी पुढे म्हणाली.

निक्की राजीवला नेमकं काय म्हणाली होती?

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या नुकत्याच झालेल्या एका भागात निक्की तांबोळी आणि राजीव अदातिया दोघांमध्ये थोडा वाद झाला. त्यावेळी बोलता बोलता निक्की राजीवला “तुला काहीच माहिती नाही का अंग्रेज”, असं म्हणाली. त्यावर राजीव अदातिया सुद्धा म्हणाला होता, “हो मला काहीच माहिती नाही. कारण मला कुणी काही सांगितलं नाही.” निक्कीने केलेल्या याच वक्तव्यावरून तिला सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे.

‘सेलिब्रिटी मास्टशेफ’ कार्यक्रमाने काही दिवसांतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या आवडत्या कलाकरांना विविध पदार्थ बनवताना पाहणे चाहत्यांना फार आवडलं आहे. नुकतंच या कार्यक्रमात पहिलं एविक्शन झालं. यामध्ये चंदन प्रभाकरला कार्यक्रमातून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर लगेचच ‘सेलिब्रिटी मास्टशेफ’मध्ये आयेशा झुलकाची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.