Celebrity MasterChef: ‘सोनी टीव्ही’वरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील नवनवीन टास्कने प्रेक्षकांना चांगल खिळवून ठेवलं आहे. काही आठवड्यांवर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा फिनाले येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या टास्क कठीण होतं आहेत. अशातच एका टास्कमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा पारा चढला. नेमकं काय झालं? जाणून घ्या…’

‘सोनी टीव्ही’च्या सोशल मीडिया पेजवर नुकताच ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. याच प्रोमोमधील अर्चना गौतमच्या एका निर्णयामुळे उषा नाडकर्णी भडकल्याचं पाहायला मिळत आहे. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा हा प्रोमो सध्या चर्चेत आला आहे.

या प्रोमोमध्ये सुरुवातीला रणवीर बरार नव्या टास्कविषयी माहिती देताना दिसत आहे. फुलं आणि काटे हा मिस्ट्री बॉक्सच्या आधारे स्पर्धकांना नवीन पदार्थ बनवायचा आहे. यावेळी आधीच्या टास्कमध्ये विजयी झालेल्या अर्चना गौतमच्या हातात एक महत्त्वाची जबाबदारी देतात. फुलं आणि काटे यातील कोणता मिस्ट्री बॉक्स कोणत्या स्पर्धका द्यायचा? हे अर्चना ठरवते. यावेळी अर्चना उषा नाडकर्णी, राजीव अडातिया यांना काट्यांचा मिस्ट्री बॉक्स देते. तर फुलांचा मिस्ट्री बॉक्स ती तेजस्वी प्रकाश देताना दिसत आहे. यामुळे उषा नाडकर्णी नाराज होतात.

प्रोमोच्या शेवटी अर्चना उषा ताई अशी हाक मारत असते. तेव्हा उषा नाडकर्णी भडकतात आणि म्हणतात, “माझं नाव घेऊ नकोस. माझ्या आयुष्यात एवढी नालायक बाई पाहिली नाही.” उषा नाडकर्णींचा हा अवतार ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये सातत्याने पाहायला मिळत आहे. त्यांचं आणि अर्चनाचं कधीच पटतं नसतं. त्यामुळे आताही तेच चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामधून ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या टॉप-५ स्पर्धकांचा खुलासा झाला होता. यामध्ये तेजस्वी प्रकाश, मिस्टर फैजू, निक्की तांबोळी, राजीव अडातिया आणि गौरव खन्ना पाहायला मिळाले होते. त्यामुळे सध्या हे पाच जण ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाचे टॉप-५ स्पर्धक असल्याची चर्चा सुरू आहे.

Story img Loader