Celebrity MasterChef: ‘सोनी टीव्ही’वरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम सध्या खूप चर्चेत आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांना सातत्याने नवीन पदार्थ बनवण्याचे टास्क दिले जातात. त्यामुळे प्रेक्षकांना ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाने चांगलंच खिळवून ठेवलं आहे. तसंच दिवसेंदिवस ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. नुकताच ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अर्चना गौतममुळे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी भावुक झाल्या आहेत. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

‘एंडेमोल शाइन इंडिया’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोन-दोन जणांची टीम टास्क करताना दिसत आहेत. निक्की तांबोळी-तेजस्वी प्रकाश, मिस्टर फैजू-दिपिका कक्कर, उषा नाडकर्णी-राजीव अदातिया, कबिता सिंग-गौरव खन्ना अशा जोड्या केल्या आहेत. यावेळी एकाला सायकल चालवायची आहे. तर दुसऱ्याला पदार्थ बनवायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे गॅस हा सायकल चालवण्यावर अवलंबून आहे.

उषा नाडकर्णी वयस्कर असल्यामुळे अर्चना गौतम सायकल चालवण्यासाठी मदत करताना पाहायला मिळत आहे. पण यावेळी अर्चना थकते आणि ती सायकल चालवत नाही. तेव्हाच राजीवला पदार्थ करण्यासाठी गॅसची गरज असते. त्यामुळे तो अर्चनावर ओरडतो. तरीही अर्चना ऐकत नाही. त्यामुळे उषा नाडकर्णी भावुक होतात आणि त्या रडायला लागतात. म्हणून अर्चना सायकलवरून उतरते आणि उषा ताईंना मिठी मारायला जाते. पण उषा नाडकर्णी अर्चना बाजूला करून म्हणतात, “जा इथून.”

याशिवाय परीक्षक रणवीर बरार निक्की आणि तेजस्वीने बनवलेला पदार्थ चाखून तोंड वाकड करतात. यावेळी रणवीर निक्कीला म्हणतो, “सकाळी उठून प्रार्थना करतेस? जर नसशील तर करत जा.” ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा हा प्रोमो सध्या खूप चर्चेत आला आहे.

दरम्यान, अभिजीत सावंतनंतर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून बाहेर झालेली स्पर्धक आयेशा झुलका आहे. ९० दशकातील बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा झुलका वाइल्ड कार्ड म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाली होती. पण १० दिवसांत आयेशाचा ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधला प्रवास संपला आहे.

Story img Loader