Bigg Boss 18 Grand Finale : ‘बिग बॉस’च्या १८ व्या सीझनच्या विजेतेपदावर यंदा करणवीर मेहराने नाव कोरलं आहे. पण, सध्या ग्रँड फिनालेमध्ये घडलेल्या एका खास गोष्टीची सर्वत्र चर्चा होत आहे. यंदाच्या पर्वात सहभागी झालेल्या चाहत पांडेने सलमान खानला थेट लग्नासाठी मागणी घातली आहे. यापूर्वी सुद्धा सीझन सुरू असताना चाहतने याबाबत वक्तव्य केलं होतं. मात्र, ग्रँड फिनाले लाइव्ह सुरू असताना चाहतने पुन्हा एकदा जाहीररित्या सलमानला लग्नासाठी विचारलं आहे. यावेळी नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान खानने शोच्या महाअंतिम सोहळ्यात चाहतला मजेशीर अंदाजात शोमधून बाहेर पडल्यावर, “पहिला फोन कोणाला केला आईला की अजून कोणाला…?” यावर अभिनेत्रीने आईला फोन केल्याचं सलमान खानला सांगितलं. पुढे, चाहतची फिरकी घेत भाईजान म्हणाला, “आई आणि बॉयफ्रेंडला कॉन्फरन्सवर घेऊन फोनवर बोलली असतीस तर किती छान झालं असतं.”

चाहत यावर सलमान खानला म्हणाली, “सर, असं नका बोलू हे सगळं खोटं आहे. लग्न करण्याची मलाही इच्छा आहे. सर, तुम्हीच करा माझ्याशी लग्न…” चाहतच्या प्रश्नावर सलमान लगेच म्हणाला, “यासाठी ( लग्नासाठी ) रजत आहे ना…त्याच्यात काय वाईट आहे” मात्र, यावेळी रजत आणि चाहतने, असं काहीच नसून… आम्हा दोघांची नावं एकमेकांशी जोडू नकात असं स्पष्ट केलं आहे.

चाहतने घातलेल्या लग्नाच्या मागणीबद्दल सलमान म्हणाला, “तुझी आईच तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधेल. तू तुझ्या आईशीच बोलू घे…” यानंतर चाहत सलमानला I Love You सुद्धा म्हणाली.

दरम्यान, ‘बिग बॉस १८’ च्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने तो चाहत पांडेच्या आईला नक्की भेटेल असं म्हटलं आहे. सलमानने असाही मजेशीर खुलासा केला की, तो चाहत पांडेच्या चाहत्यांच्या टीम्सला ( उदा. चाहत आर्मी फॅनपेजेस ) सर्वात जास्त घाबरतो, यांच्याकडून अभिनेत्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. चाहतप्रमाणे सलमानने ग्रँड फिनालेपर्यंत कशिश कपूरची सुद्धा फिरकी घेतल्याचं ग्रँड फिनालेमध्ये पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chahat pandey marriage proposal to salman khan and said i love you on grand finale set sva 00