झी मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ आज महाराष्ट्रातील घराघरात पाहिला जातो. या शोचा मोठा चाहता वर्ग आहे. या शोचे अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच यातील कलाकारांच्या सोशल मीडियार नेहमीच चर्चा होताना दिसतात. पण प्रेक्षकांना अनेकदा या शोबाबत प्रश्न असतात. या शोच्या बॅकग्राउंडला प्रेक्षकांचा हसण्याचा येणारा आवाज खरा असतो का? किंवा स्वप्नील जोशीचं हसणं स्क्रीप्टेड असतं का? तर आता प्रेक्षकांच्या या प्रश्नाचं उत्तर निलेश साबळे यांनी दिलं आहे.
झी मराठीच्या अधिकृत पेजवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात निलेश साबळे म्हणतात, “कधी प्रेक्षकांना हा प्रश्न पडतो की स्कीट सादर होताना समोर जे बसतात, ते पाहुणे कलाकार, प्रेक्षक आणि स्वप्नील जोशी खरंच हसत असतील का? तर मी आज या मंचाची शपथ घेऊन सांगतो की, या लोकांना हसण्यासाठी आम्ही कधीच सांगत नाही की आज तुम्ही जोरात हसा. किंबहुना आमची तसं करण्याची हिंमतही नाही आणि असं करूही नये. तुम्हालाही ही जादू अनुभवायची असेल तर तुम्ही झी मराठीशी संपर्क साधा आणि इथे येऊन याचा आनंद घ्या.”
आणखी वाचा- Video: विद्या बालनलाही पडली ‘चला हवा येऊ द्या’ची भुरळ, शेअर केला भन्नाट व्हिडीओ
दरम्यान ‘चला हवा येऊ द्या’ हा मराठीतील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो आहे. अनेकदा फक्त मराठीच नाही हिंदी चित्रपटांच्या प्रमोशसाठीही बॉलिवूड कलाकार या शोच्या मंचावर हजेरी लावतात आणि कलाकारांसह धम्माल मस्ती करताना दिसतात. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसते. याशिवाय या शोमधील कलाकरांचीही सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसते. प्रेक्षकांच्या मनात या शोमधील कलाकारांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.