‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या कुशल बद्रिकेने आपल्या विनोदाच्या अचूक टाइमने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. त्याने आपल्या सहजसुंदर अभिनय आणि विनोदी शैलीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे कुशलचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. नुकतीच कुशलने व्हेलेंटाइन डेनिमित्ताने बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेता कुशल बद्रिकेने बायको सुनयना बद्रिकेचा पोस्ट शेअर करत ही पोस्ट लिहिली आहे. “तुमच्या बरोबर झालंय का कधी असं? की एखादं माणूस आपल्या समोर येतं आणि जगात फक्त आपलंच घड्याळ स्लो मोशनमध्ये धावायला लागतं, न्यूटनने लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध फाट्यावर मारून आपण तरंगूच लागतो एकदम. जत्रेतल्या चष्मेवाल्याकडचा ‘गुलाबी गॉगल’ चढवल्या सारखं फक्त आपलंच जग ‘गुलाबी’ होऊन जातं आणि ‘जत्रेतला पाळणा’ अजूनही स्लो मोशनमध्ये धावत आपल्या घड्याळात अडकून पडलेला असतो. बास बास तुमचा व्यवहारी जगाशी संबंध संपला, राजाहो तुम्ही प्रेमात आहात , आता स्लो मोशन मधलं ‘जत्रेतलं घड्याळ’ आणि तुमच्या ‘मनगटावरचा पाळणा’ नॉर्मलला आणायची चावी समोरच्या माणसाकडे आहे. देव तुमचं भलं करो – सुकून….Happy Valentine’s Day.” अशी सुंदर पोस्ट कुशलने लिहिली आहे.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Archana Puran Singh reveals how Rekha responded when she asked about the mystery man in her life
अर्चन पूरन सिंगने रेखा यांना त्यांच्या आयुष्यातील ‘त्या’ मिस्ट्री मॅनबद्दल विचारलेला प्रश्न, काय उत्तर मिळालेलं? वाचा
suyash tilak and suruchi adarkar
“त्यावेळी मी सुरुचीशी खूप…”, सुयश टिळकने सांगितली ‘का रे दुरावा’ मालिकेदरम्यानची आठवण; म्हणाला, “मी थेट…”
kangana rananut call vikrant massey cockroach
एकेकाळी ज्याला म्हटलं ‘झुरळ’, आता त्याच अभिनेत्याच्या चित्रपटाचं खासदार कंगना रणौत यांनी केलं कौतुक; म्हणाल्या…

हेही वाचा – Video: नव्या मालिकांच्या शर्यतीत आता ‘कलर्स मराठी’ची एन्ट्री, केदार शिंदे यांनी केली ‘इंद्रायणी’ मालिकेची घोषणा

अभिनेत्याच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “प्रेम दिनाच्या प्रेमपूर्वक प्रेमळ खूप खूप प्रेम तुम्हां दोघांनाही”, अशी प्रतिक्रिया संतोष जुवेकरने दिली आहे. तसंच ‘किती छान लिहितोस’, ‘खूप छान’, ‘कसलं भारी लिहिलंय’, ‘आता कादंबरी लिहायला हरकत नाही’, अशा अनेक प्रतिक्रिया कुशलच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – ९०च्या दशकातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात वर्णी, साकारणार भूताची भूमिका!

दरम्यान, कुशलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या महिन्यात त्याच्या ‘स्ट्रगलर्स साला’च्या तिसऱ्या सीझनचा सातवा भाग प्रदर्शित झाला. या सीरिजमध्ये कुशलबरोबर संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, विजू माने झळकले आहेत.

Story img Loader