मराठी कलाविश्वातील अनेक नावाजलेल्या विनोदवीरांपैकी एक विनोदवीर म्हणजे भाऊ कदम म्हणजेच भालचंद्र. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तर आज प्रत्येक घराघरात भाऊ कदमचं नाव पोहोचलं आहे. भाऊने आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तो इथवरच थांबला नाही तर त्याने आता स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. भाऊसह त्याच्या कुटुंबातील मंडळीही कायम चर्चेत असतात.
भाऊची लेक मृण्मयी कदमने तर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मृण्मयीने के. जी. जोशी आणि एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलं. तिचं स्वतःचं स्वत:चं युट्युब चॅनलही आहे. २०२०मध्ये तिने ‘तारुंध्या’ हा ब्रँड सुरू केला. मृण्मयीचा ‘ट्रेंडी हेअर बो’ (Scrunchies)चा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये मृण्मयीला तिच्या आईनेही सर्वाधिक मदत केली आहे.
आणखी वाचा – Video : निक जोनसवर चाहतीनं फेकलं अंतर्वस्त्र, प्रियांका चोप्रानं असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल
मध्यंतरी एक व्हिडीओ शेअर करत मृण्मयीने आई-वडिलांचे आभार मानले होते. तसेच तिने सुरू केलेल्या ब्रँडविषयीही माहिती सांगितली होती. इतकंच नव्हे तर भाऊची पत्नी ममता कदम यांनी लेकीला तिच्या व्यवसायामध्ये बराच पाठिंबा दिला. अजूनही त्या आपल्या लेकीला मदत करतात. त्यांनी मृण्मयीच्या ब्रँडसाठी खास फोटोशूटही केलं.
या फोटोशूटमध्ये ममता यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली असल्याचं दिसत आहे. तसेच या पारंपरिक लूकमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी वयाच्या १८व्या वर्षी मृण्मयीने हा व्यवसाय सुरू केला. यादरम्यान तिच्या पाठिशी तिचं संपूर्ण कुटुंब उभं राहिलं. सुरुवातीच्या काळात व्यवसायामध्ये मृण्मयीला नुकसानही सहन करावं लागलं. पण भाऊ व त्यांची पत्नी मृण्मयीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले.