विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. गेली अनेक वर्ष त्याच्या विनोदी शैलीने तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. नुकतंच कुशलने दिवाळीनिमित्त एक पोस्ट केली आहे.

कुशल बद्रिकेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत कुशल बद्रिके हा फटाक्यांची माळ पेटवताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना त्याने प्रदूषण, फटाके, दिवाळीचा सण याबद्दल भाष्य केले आहे.
आणखी वाचा : श्रेयस तळपदेकडून नव्या चित्रपटाची घोषणा, माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी झळकणार प्रमुख भूमिकेत

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही

कुशल बद्रिकेची पोस्ट

“आमच्या लहानपणी, दिवाळीतले फटाके म्हणजे social media वर पेटवला जाणारा pollution चा मुद्दा नव्हता. जसा कंदील,रांगोळी, दिवे, ऊटण असतं तसंच फटाकेही असायचेच. आमच्या लहानपणी, आम्ही फटाके फोडत असताना माझे पप्पा घराच्या ओट्यावर बसून, आमच्यावर लक्ष ठेवायचे “लवंगी फटाक्यांच्या माळेला” जी पुढे “गाठ” असते ती सोडवून एक एक फटाका सुटा karun द्यायचे माझी दिवाळी खूप वेळ वाजत राहायची….

आता मात्र फटाके फोडायला वेळेची बंधन आहेत पण फटाक्यांच स्वरुप कमालीच बदललंय डोळ्यांना दीपवून टाकणारे, आसमंत उजळवून टाकणारे, वेग वेगळे रंग आणि आवाज काढणारे एका भुईचक्रातून असंख्य भुईचक्र निघणारे, भारावून टाकणारे फटाके मिळतात बाजारात. हल्ली दिवाळी खूप भारी असते….. फक्त साला, तो “गाठी सोडवून देणारा” माणूस आयुष्यात राहिला नाही एवढच….”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मिस्टर भावे ‘तुला पाहते रे’ ही मालिका…”, दक्षिण आफ्रिकेतील व्यक्तीचा सुबोध भावेला मेसेज, अभिनेता म्हणाला “अनेकांकडून…”

दरम्यान कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. “बाकी सगळ खरं आहे पण शेवटचे वाक्य हृदय तोडून गेलं. हरवले ते गाठ सोडविणार Miss him”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “दादा….शेवटचं वाक्य खुप छान …आणि आता माणसे राहिले कुठे”, असे म्हटले आहे. सध्या त्याच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.