झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. या कार्यक्रमातील विनोदवीरांचे असंख्य चाहते आहेत. यामधीलच एक विनोदवीर म्हणजे अभिनेता सागर कारंडे. सागर मराठी चित्रपटासह नाटकामध्येही काम करतो. सध्या नाटकाच्या दौऱ्यासाठी मुंबई बाहेर गेला आहे. यादरम्यानचाच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सागर सध्या त्याचं नाटक ‘हिच तर फॅमिलीची गंमत आहे’ नाटकाच्या प्रयोगामध्ये व्यग्र आहे. पण काम करत असताना तो धमाल-मस्ती करतानाही दिसत आहे. त्याच्या टीमबरोबर सागर कराड येथे असलेल्या आपल्या गावी पोहोचला. सागरने त्याच्या टीमसह गावी अगदी एण्जॉय केलं. नदीकाठी बसून गावच्या वातावरणाचा आनंद लुटला.

पाहा व्हिडीओ

सागरचं कराड येथे गाव आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो आपल्या शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सागरने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “ट्रॅक्टर ऑन ट्रॅक.”

आणखी वाचा – परतीच्या पावसामुळे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या शेतीचं नुकसान, म्हणाले, “हातातोंडाशी आलेला घास…”

तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्याची मित्र-मंडळी नदीकाळी बसलेली आहेत. तर एक मित्र नदीमध्ये पोहोताना दिसत आहे. ‘हिच तर फॅमिलीची गंमत आहे’ नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chala hawa yeu dya actor sagar karande video goes viral on social media see details kmd