कुशल बद्रिके हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून घराघरात पोहोचलेल्या कुशलने अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. त्याने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
कुशल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. हिरव्या रंगाचं टी-शर्ट व त्यावर लेदरचं जॅकेट घातलेला फोटो कुशलने पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “Investment चुकली की loss होतोच , कधीकधी तर आपला मुद्दलमाल सुद्धा परत मिळत नाही. सगळं बाजारावर depend करतं”, असं कॅप्शन कुशलने फोटोला दिलं आहे.
हेही वाचा>> प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच ‘पठाण’ झाला लीक! यशराज फिल्म्स ट्वीट करत म्हणाले…
“Emotional investments ना सुद्धा हाच नियम लागू पडतो. फरक एवढाच आहे की इथे investment चुकली की माणसाचाच बाजार उठतो. (अपनेआपको पूरी सावधानी से invest करे! )”, असंही त्याने पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे. कुशलची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
हेही वाचा>> धीरेंद्र शास्त्री महाराजांमुळे चर्चेत आलेली सुहानी शाह कोण आहे? अनेक सेलिब्रिटीही करतात फॉलो
कुशल बद्रिके सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ‘पांडू’,’जत्रा’, ‘स्लॅमबूक’, ‘डावपेच’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ अशा अनेक चित्रपटांत त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.