विनोदाचं अचूक टायमिंग आणि उत्तम अभिनय यामुळे सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेला ‘चला हवा येऊ द्या’मधील (Chala Hawa Yeu Dya) सर्वांचा लाडका विनोदी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (Kushal Badrike). अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या अभिनयाबरोबरच लिखाणानेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असून या फोटो व व्हिडीओखालील त्याचे कॅप्शनमुळे कौतुक होते. अशातच होळी व रंगपंचमीच्या पूर्वसंध्येवर त्याने सोशल मीडियावर आपला एक खास सेल्फी फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोखाली त्याने हटके कॅप्शन लिहिलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कुशल बद्रिकेची इन्स्टाग्राम पोस्ट
या पोस्टमध्ये कुशलने (Kushal Badrike) असं म्हटलं आहे की, “आयुष्यात आलेली काही माणसं, त्यांची वेळ आली की आप-आपले रंग दाखवतात आणि निघून जातात. असल्या अनुभवांनी आपल्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. पण या दोन्ही प्रकारच्या रंगानी होळी (धुळवड) खेळता येत नाही आणि ज्या रंगानी ती खेळता येते, त्यातले बरेचसे रंग कोणत्या ना कोणत्या तरी समाजाने वाटून घेतलेत. नाहीतर कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाने वाटून घेतलेत. या होळीत जर चुकून माझ्याकडून असा एखादा रंग उधळला गेलाच तर तो “होळीचाच” होता, हे मी आत्ताच जाहीर करतो. आपल्या भावना दुखावण्याचा हेतू माझ्या ‘अंत-रंगात’ नाही”.
कुशल बद्रिकेचे चाहत्यांकडून कौतुक
या पोस्टसह त्याने “या दिवशी पाण्याने होळी खेळणाऱ्याची तर बिनपाण्याने केली जाते” अशी तळटीपदेखील लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याचे कमेंट्समध्ये कौतुक केलं आहे. “कुशल नामक अवलिया शब्दरंग उधळण्याचं कौशल्य दाखवतो, त्याक्षणीच आम्ही प्रेमरंगात रंगतो”, “कडक”, खूप छान”, किती भारी लिहिता” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी त्याचे या पोस्टनिमित्त कौतुक केलं आहे. शिवाय अनेकांनी त्याला होळीनिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
अभिनेता कुशल बद्रिकेबद्दल
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’मधून (Chala Hawa Yeu Dya) कुशलने (Kushal Badrike).अनेक विनोदी स्किट्सद्वारे प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले. तब्बल दहा वर्ष या शोने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. यानंतर त्याने हिंदी टेलीव्हिजनकडे आपला मोर्चा वळवला. सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या विनोदी कार्यक्रमामधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. कुशलच्या या शोलादेखील प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. दरम्यान, आता कुशल कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याची सर्वजण वाट पाहत आहेत.