‘स्ट्रगलर साला’ या युट्यूबवरील वेब सीरिजने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या सीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतली उतरले होते. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच ‘स्ट्रगलर साला’चा सीझन तीनचा सहावा भाग प्रेक्षकांचा भेटीस आला आहे. त्याचनिमित्तानं सीरिजमधील कलाकार अभिनेता कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण आणि लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने, अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये सहभागी झाले होते. यावेळी कुशल बद्रिकेनं एका फेसबुक लाईव्हचा किस्सा सांगितला. ज्यामुळे राजकीय गोंधळ निर्माण झाला होता.

हेही वाचा – “मी पवित्र…”; राखी सावंतचा नवा व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, “पुरुषांनी मला स्पर्श…”

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “महाविकास आघाडी आणि काँग्रेस आमदार, खासदारांंमध्ये अस्वस्थता; अनेकजण…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

कुशल म्हणाला की, “मी ठाण्यात शिफ्ट झालो होतो. माझ्या त्या घरासमोरच एक ब्रिज सुरू होतो. त्या ब्रिजच्या एका भिंतीला दर दिवसाआड एक गाडी धडकायची. रात्री-बेरात्री असं झालं की, मी यांना (विजू माने) फोन करायचो. दादा आज रात्री अपघात झाला हो. हे दर दिवसाआड व्हायचं आणि हे (विजू माने) म्हणायचे, हा, आपण बघू या कुश्या. एकेदिवशी मी चला हवा येऊ द्याच्या शूटिंगवरून आलो. रात्रीचे तीन-साडे तीन वाजले होते. त्याच्या दोन दिवस आधी त्या ब्रिजच्या भिंतीवर मारुती गाडी चढली होती. मग मी रात्री जाऊन पाहिलं होतं. त्या कुटुंबाला काय नव्हतं झालं. पण एक लहान मुलं होतं, एक महिला होती, एक पुरुष होता. मग मी यांना पुन्हा फोन करून सांगितलं आणि म्हटलं, हा काय मुर्खपणा आहे. नेहमी घडतंय, याला काय अर्थ आहे? त्यावर हे म्हणाले, आपण त्याच्यावर तातडीने उपाय करू. तू कधी फ्री आहेस. मी म्हटलं, माझं दोन दिवस शूट आहे, त्याच्यानंतर मी येतो. हे म्हणाले, ठीक आहे आपण जाऊ या. ते काम करू.”

हेही वाचा – रजनीकांत ठरले भारतातील सर्वात महागडे अभिनेते; ‘जेलर’साठी घेतलेलं मानधन ऐकून व्हाल थक्क

“जेव्हा मी चला हवा येऊ द्याच्या शूटींगवरून आलो होतो, त्या दिवशी एक ट्रक पलटी झाला होता. ऑइल किंवा कसला तरी होता आणि ते सगळं रस्त्यावर पडलं होतं. मला ते पाहून इतकी चिड आली. रोज लोकांना असा त्रास होतोय. मी यांना (विजू माने) पुन्हा तीन-साडे तीनला फोन केला. म्हटलं, दादा हे आता अती झालं. हे माझ्या आता डोक्याच्यावर गेलंय. याच्यावर आता काय करू बोला? मी आता फेसबुक लाईव्ह करू का? हे होते झोपेत. हे म्हणाले कर. मग लगेच फोन कट केला आणि मी फेसबुक लाईव्ह केलं. मी अत्यंत व्यवस्थित त्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं होतं की, माझ्या घरासमोर असं असं आहे आणि इथे सतत अपघात होतायत. यामुळे लोकांना त्रास होत आहे. मला तक्रार करण्यासाठी प्रक्रिया माहित नव्हती, त्या हेतूने ते लाईव्ह केलं होतं. त्यात मी स्पष्ट म्हटलं होतं की, आजच्या डिजिटलच्या जमान्यात हा माझा अर्ज समजा आणि संबंधित लोकांपर्यंत हे पोहोचवा. मी यांना पुन्हा फोन करू सांगितलं, दादा मी व्हिडीओ केला . ते म्हणाले, ओके कुश्या, तू घरी जा, उद्या बघूया आपण.”

हेही वाचा – अभिनेत्री तेजश्री प्रधानला आवडतं ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘हे’ पात्र, म्हणाली….

पुढे कुशल म्हणाला की, “माझं एक असं आहे की, रात्री झोपताना मी फोन एरोप्लेन मोडवर टाकतो आणि झोपून जातो. या फेसबुक लाईव्हनंतर मी उठवलो. तर बघितलं यांचे (विजू माने) खूप मिसकॉल होते. म्हटलं, सकाळी-सकाळी याचं काय आहे? आता तर पहाटे बोललो होतो. फोन केल्यावर हे म्हणतात, कुश्या, कुश्या तू हे काय केलंस.”

त्यानंतर विजू माने म्हणाले की, “याच्या व्हिडीओमुळे खूप राजकीय गदारोळ माजला. तिथला आमदारांना असं वाटलं की, कुश्याने त्यांच्या विरोधात केलं. त्या आमदारांचा मला फोन. अरे काय त्या कुशलला प्रोब्लेम होता तर त्याने सांगायला पाहिजे होतं ना. त्याने फेसबुक लाईव्ह का केलं? ते आमदार आपलेच मित्र होते म्हणून मी त्यांना समजवलं. कुशलच्या मनात असं काही नव्हतं वगैरे वगैरे. कुशलला कॉन कॉलवर घेऊन त्यांच्याशी बोलणं करून दिलं. हे झाल्यानंतर मला विरोधी पक्षाकडून फोन. हे जे कुशलने हत्यार उचललं आहे ते योग्य आहे. आता आपण त्याच्याबरोबर मोठं आंदोलन करणार कुठे राहतात कुशल बद्रिके? त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी भरपूर गर्दी झाली होती. तिथे वेगवेगळ्या संघटना जमल्या होत्या. एकाबाजूला विरोधी पक्ष तिथे पोहोचला. तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्ष पोहोचला, असं करून सकाळी त्या पूर्ण रस्त्यात वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे होते.”

हेही वाचा – बिग बॉस फेम अभिनेत्रीचा भाऊ हॉस्पिटलमध्ये दाखल; फोटो शेअर करत म्हणाली…

मग कुशल म्हणाला की, “मी सकाळी माझ्या घराच्या गॅलरीतून बघतोय, तर म्हटलं, हे काय चाललंय? एवढं चालू असताना माझ्या घरी खालून फोन आला, तर मी दुसऱ्यांना म्हटलं उचला. कारण मला सकाळपासून खूप विचित्र फोन येत होते. आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची आहे. आपण बोलू शकतो का? आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. तुमच्या हाताने तिथे झेंडा रोवायचा आहे, असे सगळे फोन येत होते. इथंपर्यंत हे प्रकरण गेलं. घरात आलेल्या त्या फोनवरून सांगण्यात आलं की, अमूक असे साहेब येतायत. तिथे आपण झेंडा रोवून निदर्शन करू. मी म्हटलं, मी नाही म्हणून सांग. मी माझ्याच घरात घाबरून बाथरुममध्ये शिरलो. कारण हे सगळं मला माहित नव्हतं. मी एका वेगळ्या हेतूनं पहाटे चार वाजता ते फेसबुक लाईव्ह केलं होतं. आणि सकाळी नऊ वाजता सगळं हे माझ्याबरोबर असं घडतं होतं. मी यांना (विजू माने) पुन्हा फोन केला. म्हटलं, माझ्या घराच्या खाली लोकं आहेत. माझ्या घराच्या समोर लोकं आहेत. मला इथून घेऊन जा. माझी फूल वाट लागली आहे. मला इथून बाहेर काढा. कारण हे विचित्र आहे. काय घडतंय हे कळतंच नाहीये.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला ‘हा’ क्षण आठवला की डोळ्यात येतं पाणी; म्हणाली, “करिअर संपलं…”

“खरंतर मला राजकारणातलं काहीच कळतं नाही. कोण कुठल्या पक्षाचा आहे हे सुद्धा कळतं नाही. पण त्या फेसबुक लाईव्हवर इतकं राजकारण झालं. हा अर्ज समजा हे ते बोललो होतो, ते संबंधित लोकांपर्यंत पोहोचवा, हे सांगितलं होतं. पण ते सगळं खोडून, काढून बघा काय म्हणतोय हा. अमूक एका पक्षावर टीका केली. पण देवाच्या कृपेने संबंधित लोकं समंजस होते. मला त्यातून वेगळा काही त्रास झाला नाही. तेवढ्याच दोन-तीन गोष्टी झाल्या आणि मग ते सगळं संपलं,” असं कुशल म्हणाला.

Story img Loader