छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला ओळखले जाते. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम अगदी आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमात चित्रपट किंवा मालिकांचे अनेक कलाकार हजेरी लावत असतात. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहल शिदम. नुकतंच तिच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.
स्नेहल शिदम ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. स्नेहलने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत तिने तिच्या लग्नाचा उल्लेख केला आहे. यावेळी तिने खोचक टोलाही लगावला आहे.
आणखी वाचा : “कॉलेजपासून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने स्नेहलबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन
“माझ्या वयाची मुलं लग्न करतात, मी निदान अंघोळ तरी करते”, अशी पोस्ट स्नेहलने केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
आणखी वाचा : “लव्ह यू…”, स्नेहल शिदमच्या ‘त्या’ फोटोवर निखिल बनेच्या कमेंटने वेधलं लक्ष
दरम्यान स्नेहल ही ‘चला हवा येऊ द्या ‘च्या ‘होऊ द्या व्हायरल’ या पर्वाची विजेती होती. ती किर्ती कॉलेज, दादरमधील विद्यार्थिनी आहे. स्नेहलने ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटामधून तिने मोठ्या पडद्यावरही पदार्पण केलं. काही दिवसांपूर्वी स्नेहल आणि अभिनेता निखिल बने रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. पण त्या दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केलेले नाही.