‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून अंकुर वाढवेला ओळखले जाते. तो सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. तो अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र आता अंकुरचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. याबद्दल त्याने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. अंकुर वाढवेचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे बोललं जात आहे. त्याच्या अकाऊंटवरुन अश्लील गोष्टी पोस्ट होऊ लागल्या आहेत. ही गोष्ट अंकुरच्या लक्षात येताच त्याने थेट सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.
आणखी वाचा : अरिजीत सिंगच्या गाण्यातील भगव्या शब्दावरून भाजपा-तृणमूल काँग्रेसमध्ये जुंपली, कॉन्सर्ट रद्द करण्याचे खरं कारण समोर
अंकुरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने सायबर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीची प्रत शेअर केली आहे. त्याबरोबर तो म्हणाला, “मित्रांनो माझे फेसबुकचे पेज काही दिवसांपासून हॅक झालेले आहे. त्यावर जे पोस्ट होतंय त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. बऱ्याच मित्रांनी मला कॉल व मेसेज करून याबद्दल माहिती देवून चिंता व्यक्त केली. तदसंबंधी मी आजच सायबर ला तक्रार दाखल केलीय काळजी नसावी आणि असच पाठीशी उभे रहा धन्यवाद!”
“सतर्क रहा माझ्या या पेजवरून काहीही मेसेज आला तर दुर्लक्षित करा नशिबाने अजून तसे कोणाला मेसेज नाही आले. ही महिती माझ्या व तुमच्याही मित्रांपर्यंत पोहचवा”, असं आवाहन त्याने केले आहे.
आणखी वाचा : ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…
दरम्यान अंकुरचे फेसबुक अकाऊंट २४ डिसेंबरला हॅक झाले आहे. याद्वारे अंकुरची बदनामी केली जात आहे. अंकुरचं फेसबुक अकाऊंट कोणी हॅक केलं आणि त्याचे लोकेशन काय आहे याची माहिती देण्याची विनंती त्यानं सायबर पोलिसांना केली आहे. सध्या तो चला हवा येऊ द्या मध्ये काम करत आहे. त्याबरोबर वासूची सासू या नाटकातही तो झळकताना दिसत आहे.