‘चला हवा येऊ द्या’ हा शो गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोमधील कलाकारही खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. हे कलाकार फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. या शोमधील कलाकारांपैकी एक भाऊ कदम सध्या कोकणातील गावी गेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी दिली मुलांच्या कामांबद्दल माहिती, म्हणाले, “पार्थेशने दोन वर्षे…”

भाऊ कदम कणकवलीला गेला आहे. तिथून त्याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत भाऊ कदमबरोबर त्याचा भाऊ दिसत आहे. त्याने ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. त्यात दोघेही भाऊ खुर्चीवर बसले दिसत आहेत. फोटोत ते जुनं कौलारू घर असल्याचं दिसतंय. घराच्या बैठकीत दोघेही भाऊ बसले आहेत. या घराचे वासे लाकडी आहेत. घरात टीव्ही दिसतोय आणि थोडं सामान आहे.

भाऊ कदमने हा फोटो शेअर केल्यानंतर दोघेही भाऊ सारखेच दिसतात, अशा कमेंट्स केल्या आहेत. तसेच काही चाहत्यांनी या फोटोचं खूप बारीक निरीक्षण केलं आणि घराच्या वाशावर लिहिलेला मजकूर वाचला. ‘मनाचे मोठेपण आईच्या हाती असते’ आणि ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ अशी दोन वाक्ये त्या वाशांवर लिहिलेली आहेत.

भाऊ कदमच्या पोस्टवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, यावर नेटकरी कमेंट्स करत आहेत. काहिंनी तुम्हाला भाऊ आहे हे माहीत नव्हतं, असं म्हटलं आहे. तर, अनेकांनी त्या लाकडी वाशांवर लिहिलेल्या वाक्यांचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chala hawa yeu dya fame bhau kadam shared photo from kankavli home hrc