‘झी मराठी’वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके नेहमी चर्चेत असतो. कुशलने आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीनं मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्याचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. कुशलनं बऱ्याच मराठी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. नुकताच त्यानं सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: “माय आता भेटत नाही…”; आई सीमा देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक

अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. कुशल आपल्या अभिनयाबरोबर सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असतो. हा विनोदवीर सोशल मीडियावरही मजेशीर व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना हसवतं असतो. असाच एक व्हिडीओ त्यांनं नुकताच शेअर केला; ज्यामध्ये त्याच्या गाडीत भररात्री शेरो-शायरीची बैठक रंगल्याच पाहायला मिळत आहे. त्याच्याबरोबर भाऊ कदम देखील आहे.

हेही वाचा – “बुरखा घालायला हवा होता?” अभिनेत्री रुचिरा जाधव ट्रोल करणाऱ्यावर भडकली, नेमकं काय घडलं?

या व्हिडीओत, भाऊ कदम कुशलला शायरी म्हणायला सांगतो. तेव्हा कुशल ‘वीर गुर्जर’ची शायरी म्हणून दाखवतो. तो म्हणतो की, “ये दुनिया बडी जालीम है, हर राज छुपाना पडता है. दिल में कितना ही गम हो. महफिल में मुस्कुराना पडता है.” यानंतर भाऊ कदम म्हणतो की, “तुझं काय पाठांतर आहे…व्वा..” मग कॅमेरा समोर असलेल्या ट्रॅकवर फोकस करतात; ज्यावर ‘वीर गुर्जर’ची शायरी लिहीलेली असते.

हेही वाचा – Video: कोणती अभिनेत्री तयार व्हायला सर्वात जास्त वेळ लावते? अशोक सराफ म्हणाले…

हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत कुशल बद्रिकेनं कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, “भाऊ कदम आणि मी बऱ्याचदा आमच्या दोघांचीच मैफल रंगते. तशी आमच्या मैत्रीला बरीच वर्ष झाली पण आजही आमचा प्रवास एकत्रच होतो. रात्री ३/४ ला पॅकअप करुन निघाल्या नंतर प्रवासात भाऊ आणि माझी मैफिल सुरू होते. याबरोबरीला कधी गुलाम अली साहेब, मेहदी हसन साहेब, कधी पंकज उदास, कधी जगजीत सिंगजी, कधी हरिहरन, कधी लता ताई, कधी साब्री ब्रदर्स अशी असंख्य दिग्गज आमच्याबरोबर गाडीत असतात….काल मात्र रात्री ४:३० ला “शेरो-शायरी”ची बैठक बसली ‘वीर गुर्जर’ साहेबान बरोबर त्याची ही छोटीशी झलक…”

हेही वाचा – Video: हॉलीवूड अभिनेत्रीबरोबरच्या ‘त्या’ कृतीमुळे रणबीर कपूर ट्रोल; नेटकरी म्हणाले, “आरकेनं संधी साधली”

कुशल बद्रिकेच्या या मजेशीर व्हिडीओवर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, पुष्कर जोग, शर्मिला शिंदे, स्नेहलता वसईकर या कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.