गेली कित्येक वर्षे महाराष्ट्राला खळखळून हसवणारा कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ काही महिन्यांपूर्वी बंद झाला. आता यामधील कलाकार वेगवेगळ्या कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत. डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, स्नेहल शिदम सध्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवण्याचं काम करत आहेत. तसंच कुशल बद्रिके हिंदीतील ‘मॅडनेस मचाएंगे’ कार्यक्रमात आपल्या जबरदस्त विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. आता यामध्ये आणखी एका ‘चला हवा येऊ द्या’मधील लोकप्रिय विनोदवीराची वर्णी लागली आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने सिनेसृष्टीला अनेक अवलिया कलाकार दिले. डॉ. निलेश साबळेसह भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम, उमेश जगताप, योगेश शिरसाट असे बरेच कलाकार ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून घराघरात पोहोचले. पण काही कलाकारांनी कार्यक्रम बंद होण्याआधीच रामराम केला. त्यापैकी एक म्हणजे सागर कारंडे.

anushka pimputkar and meghan jadhav started new business
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री झाली बिझनेसवुमन! ‘या’ अभिनेत्याच्या साथीने सुरू केला हटके व्यवसाय; पाहा झलक
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
Kushal Badrike and Viju Mane wished Pravin Tarde on his birthday in a funny prediction
Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी

हेही वाचा – Video: मराठी अभिनेत्रीच्या आजीला ‘गुलाबी साडी’ गाण्याची पडली भुरळ; नटून-थटून केला भन्नाट डान्स

कधी महिलेच्या पात्रात तर कधी पोस्टमन बनून येणाऱ्या सागर कारंडेने ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम मध्यावरच सोडला. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. याच दरम्यान सागरची दोन नाटकं रंगभूमीवर जोरदार सुरू होती. त्यामुळे सागरने ‘चला हवा येऊ द्या’ सोडल्याचं म्हटलं जाऊ लागलं. पण खरं कारण होतं सागरचं आजारपण. अपुरी झोप, अवेळी जेवण यामुळे अभिनेता आजारी होता. एवढंच नव्हे तर त्याला रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं होतं. त्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव सागरने ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम सोडला. त्यानंतर तो ‘सारेगमप’ किंवा ‘जाऊ बाई गावात’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळाला. पण आता सागर थेट हिंदी कार्यक्रमात दिसणार आहे.

सध्या चर्चेत असलेला ‘मॅडनेस मचाएंगे’ कार्यक्रमात सागरची वर्णी लागली आहे. अभिनेता कुशल बद्रिके, हेमांगी कवी, गौरव मोरे, अतिशा नाईकनंतर सागर कारंडेची या कार्यक्रमात एन्ट्री झाली आहे. या कार्यक्रमातील त्याच्या स्किटचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे. सागरला पुन्हा पाहून त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीची झाली फसवणूक, संतप्त विदिशाने पोस्ट करत कलाकारांना केली ‘ही’ विनंती

दरम्यान, सागर कारंडेच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर,  ‘इंद्रधनुष्य’ चित्रपटात तो झळकणार आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचं चित्रीकरण करताना सागर लंडनमध्ये दिसला होता. या चित्रपटात सागर कारंडेसह अभिनेता स्वप्नील जोशी, दीप्ती देवी, प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील असे बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.