मराठी मनोरंजनसृष्टील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून श्रेया घराघरांत पोहोचली. ‘कॉमेडी क्वीन’ म्हणूनही श्रेयाला ओळखले जाते. सोशल मीडियावर श्रेया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. निरनिराळे व्हिडीओ व फोटो शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. अशात श्रेयाने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा- Video: ‘झी मराठी’वरील दोन नव्या मालिकांचे प्रोमो समोर, ‘या’ अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत

Ankita Walawalkar First Kelvan
Video : “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने घेतला हटके उखाणा, ‘असं’ पार पडलं पहिलं केळवण
amruta khanvilkar slams netizen who is asking about her husband
“तुझा नवरा कुठे आहे?” गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना…
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
ankita walawalkar aka kokan hearted girl first kelvan
‘कोकण हार्टेड गर्ल’ची लगीनघाई! अंकिता-कुणालचं पार पडलं पहिलं केळवण, फोटो आला समोर, लग्नपत्रिका पाहिलीत का?
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी

श्रेया व तिचा पती निखिलने नुकताच लग्नाचा नववा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याने श्रेयासाठी खास सरप्राइजचे आयोजन केले होते. श्रेयाने इन्स्टाग्रामवर या सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले आहेत. श्रेया व निखिलने एका yacht वर लग्नाचा नववा वाढदिवस साजरा केला. त्यासाठी एका संपूर्ण होडी (yacht)ला फुग्यांनी सजवण्यात आले होते. या प्रसंगी निखिलने श्रेयाला गुलाबांचा गुच्छही भेट स्वरूपात दिला आहे. श्रेयाने नवऱ्याबरोबरचे काही रोमँटिक फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. श्रेयाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी कमेंट्स करीत तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

व्यावसायिक आयुष्याबद्दल श्रेया भरभरून बोलताना दिसते. मात्र, तिच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना फारशी माहिती नाही. श्रेयाच्या नवऱ्याचे संपूर्ण नाव निखिल सेठ, असे आहे. एका मालिकेच्या सेटवर श्रेया व निखिलची पहिली भेट झाली. पहिल्याच भेटीत निखिलला श्रेया आवडली होती. त्यामुळे तो तिच्याबरोबर मैत्री करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, श्रेयाकडून तसे काहीच नव्हते. दरम्यान, काही कारणाने दोघांमध्ये भांडण झाले आणि दोघांनी एकमेकांशी बोलणे बंद केले.

हेही वाचा-

काही दिवसांनी एका मालिकेचा निर्माता म्हणून निखिलचे नाव बघितल्यानंतर श्रेयाने त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. त्यानंतर त्यांच्यातील थांबलेला संवाद पुन्हा सुरू झाला. दरम्यान, निखिलला लग्नासाठी मुली बघणे सुरू होते. निखिलला श्रेया आवडायची. त्यामुळे त्याने श्रेयालाच लग्नाची मागणी घातली. श्रेयालाही निखिल आवडू लागला होता. त्यामुळे तिनेही लगेच होकार दिला आणि २०१५ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.

Story img Loader