काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या फेम’ स्नेहल शिदमने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बने याच्याबरोबर एक रोमँटिक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. दोघांचा तो फोटो खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर निखिल बनेने या फोटोंबद्दल प्रतिक्रिया दिली होती, पण स्नेहल मात्र यावर काहीच बोलली नव्हती. आता स्नेहल शिदमने पहिल्यांदाच त्या फोटोबद्दल मौन सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“तुम्हाला सुखरूप जाऊ दिलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांना जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “त्या दिवशी…”

स्नेहल शिदम व निखिल बने यांनी अभिनेत्री वनिता खरातच्या लग्नात हजेरी लावली होती. लग्नसोहळ्यातील एक फोटो त्यांनी शेअर केला होता. यावेळी ते दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन उभे होते आणि स्नेहल लाजताना दिसत होती. या फोटोला तिने “पिरतीच्या फडात गं…धरला हात असा…काळीज येंधलं आरल …” असं कॅप्शन दिलं होतं. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे स्नेहल व निखिल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या, पण असं काहीच नसल्याचं स्पष्टीकरण निखिलने दिलं होतं. त्यानंतर स्नेहलनेही या फोटोबद्दल भाष्य केलं आहे.

स्नेहल म्हणाली, “लोकांना फार क्रेझ असते की सेलिब्रिटींच्या आयुष्यात नक्की काय चाललंय ते जाणून घेण्याची. आतापर्यंत अनुष्का शर्मा काय करते, काय घालते, कशी राहते याबद्दल लोकांची क्रेझ मी पाहिली होती. पण, तो फोटो व्हायरल झाल्यानंतर तीच क्रेझ आमच्याबद्दल आहे हे बघून भारी वाटलं. खरं तर मी आणि निखिल खूप सॉर्टेड आहोत, आमचं अफेयर नाही आणि चांगले मित्र आहोत,” असं स्नेहलने सांगितलं.

Video: “हे असले चाळे…” ‘त्या’ व्हिडीओमुळे ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात ट्रोल

फोटो व्हायरल झाल्यावर त्याच्या बातम्या आल्या, त्यानंतर खूप लोकांचे फोन आल्याचं स्नेहलने सांगितलं. “दोन-तीन दिवस आम्हाला खूप लोक फोन करत होते, आम्हाला सांगितलं का नाही, असं विचारत होते. पण नंतर निखिलची प्रतिक्रिया आणि त्याने सर्व गोष्टी स्पष्ट केल्या, त्यानंतर सगळं थांबलं,” असं स्नेहल हसत म्हणाली.