मराठी कलाविश्वात अनेक नावाजलेले विनोदवीर आहेत. मात्र काही विनोदवीर असे आहेत, ज्यांनी थेट प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता, विनोदवीर भाऊ कदम. आपल्या विनोदबुद्धीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांची मनं जिंकली. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामधून भाऊ कदम प्रकाश झोतात आला. आता त्याने एक नवी सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “ती माझ्या आयुष्यातील…” अमृता देशमुखबरोबर असलेल्या नात्याबाबत प्रसाद जवादेचा खुलासा

नववर्षाच्या सुरुवातीला भाऊ कदमने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याने स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. भाऊने याबाबत एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. भाऊ कदम असं त्याच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. त्याने पहिला व्हिडीओही या चॅनलवर शेअर केला आहे.

भाऊ कदम म्हणाला, “नवीन वर्षापासून मी स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. तुम्ही माझं चॅनल नक्की बघा. माझ्या या चॅनलला लाइक व सब्सक्राइब करा.” भाऊ कदमने नवीन काहीतरी करण्याचा आता प्रयत्न केला आहे. या चॅनलद्वारे तो त्याच्याविषयी तसेच त्याच्या कामाविषयी विविध माहिती देताना दिसणार आहे.

आणखी वाचा – “कोणत्याही कलाकाराने यापुढे…” प्रसाद जवादेच्या ‘त्या’ पोस्टनंतर ‘बिग बॉस मराठी’वर भडकले प्रेक्षक, प्रार्थना बेहरेनेही केली कमेंट

भाऊ कदमने शेअर केलेल्या या पहिल्याच युट्यूब व्हिडीओमध्ये त्याच्या खासगी आयुष्याबाबत तसेच कामाविषयी भाष्य केलं आहे. त्याच्या या व्हिडीओला अधिकाधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. भाऊ कदमच्या या नव्या प्रवासासाठी त्याच्या चाहत्यांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chala hawa yeu dya fem actor bhau kadam started his own youtube channel watch video kmd