‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षक अगदी आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील कलाकारांनाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं. ‘चला हवा येऊ द्या’मुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे योगेश शिरसाट. योगेशने आजवर या कार्यक्रमामध्ये विविध भूमिका साकारल्या. रुपेरी पडद्यावरही त्याने साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं. आता त्याच्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने याबाबत भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘चला हवा येऊ द्या – लहान तोंडी मोठा घास’ हे नवीन पर्व १५ मे पासून सुरू झालं आहे. या नव्या पर्वामध्ये लहान मुलं प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसत आहेत. आता या नव्या पर्वाच्या निमित्ताने योगेशचा मुलगा प्रख्यात शिरसाटने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. याचा योगेशला खूप अभिमान आहे.

आणखी वाचा – Video : प्रसाद ओकबरोबर परदेशात काय घडलं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक, अभिनेता म्हणतो, “जगाच्या कानाकोपऱ्यात…”

‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅननला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगेशने याबाबत भाष्य केलं. “प्रख्यातची या कार्यक्रमामध्ये कशी एंट्री झाली?” असा प्रश्न योगेशला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “तो या कार्यक्रमामध्ये येण्यामागे माझे काहीच प्रयत्न नव्हते. प्रख्यातचा अभिनय आणि तो किती सक्रिय आहे हे निलेश साबळेने पाहिलं होतं. तर निलेश मला म्हणाला की, प्रख्यातला तू ऑडिशनला पाठव”.

आणखी वाचा – गरोदरपणात सुप्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागतोय ‘या’ आजाराचा सामना, आता ‘अशी’ झाली आहे अवस्था

“तो जर चांगलं काही करत असेल तर त्याला या कार्यक्रमामध्ये घेऊया. त्यानंतर मी प्रख्यातला पानभर एक स्किट लिहून दिलं. ते त्याने १५ ते २० मिनिटांमध्ये पाठ करुन मला म्हणून दाखवलं. प्रख्यातचा हाच व्हिडीओ मी निलेशला पाठवला. निलेशलाही त्याचा हा व्हिडीओ खूप आवडला. शिवाय गेली पाच ते सहा वर्ष मी निलेशबरोबर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे लेखन करत आहे. नेपोटिझम इथेही सुरू झालं असं अनेकांना वाटायची शक्यता आहे. पण असं काहीही नाही. मी माझ्या मुलासाठी काहीही प्रयत्न केलेले नाही. तो त्याच्याप्रमाणे सगळं काही करतो. त्याला त्याची आवड आहे”. योगेश त्याच्या मुलाला ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर पाहून खूपच खुश होतो.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chala hawa yeu dya fem yogesh shirsat son prakhyat start his acting career actor says i am very proud see details kmd
Show comments