Chander Prakash Kaun Banega Crorepati 16: क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकांच्या आवडत्या शोपैकी एक आहे. या रिअॅलिटी शोचे होस्ट महानायक अमिताभ बच्चन आहेत. या शोचे सध्या १६ वे पर्व सुरू आहे. ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या या शोला अखेर पहिला करोडपती मिळाला आहे.

‘कौन बनेगा करोडपती १६’ चे आतापर्यंत ३२ एपिसोड झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत बरेच स्पर्धक आले, हॉट सीटवर बसले, अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली आणि पैसे जिंकून गेले. आता १६ व्या पर्वाचा पहिला करोडपती मिळाला आहे. काश्मीरमधील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय चंद्र प्रकाशने एक कोटी रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले आणि तो करोडपती झाला. मात्र सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकला नाही.

“मी बाहेर येऊन बघितलं की त्यांनी…”, अरबाज पटेलने रितेश देशमुखबाबत केलेले वक्तव्य चर्चेत; म्हणाला, “खूप गोष्टी…”

बिग बींचा शो ‘कौन बनेगा करोडपती’ सातत्याने लोकांचे मनोरंजन करत आहे. बरेच लोक या शोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत असतात. हा शो बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही मोठी आहे. आता २२ वर्षीय चंद्र प्रकाशने तब्बल एक कोटी रुपये जिंकण्याने सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. त्याला एक कोटी रुपयांसाठी कोणता प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचे अचूक उत्तर देऊन तो करोडपती झाला, ते जाणून घेऊयात.

Bigg Boss Marathi 5 चा विजेता ठरला? सूरज चव्हाण, अंकिता नव्हे तर ‘हा’ सदस्य मारणार बाजी, ‘तो’ फोटो चर्चेत

एक कोटी रुपयांसाठी विचारलेला प्रश्न

प्रश्न: कोणत्या देशातील सर्वात मोठे शहर त्याची राजधानी नसून तेथील बंदर आहे, ज्याच्या नावाचा अरबी भाषेतील अर्थ शांततेचे निवासस्थान असा होतो.

ऑप्शन – ए – सोमालिया, बी – ओमान, सी – टांझानिया आणि डी – ब्रुनेई

या प्रश्नाचे बरोबर उत्तर ऑप्शन सी टांझानिया होते. चंद्र प्रकाशने हेच उत्तर दिलं आणि तो एक कोटी रुपये जिंकून करोडपती झाला. त्यानंतर त्याला सात कोटी रुपयांसाटी जॅकपॉट प्रश्न विचारण्यात आला. त्याने या प्रश्नाचे सर्व ऑप्शन ऐकल्यावर सांगितलं की त्याला याचे उत्तर माहीत नाही. त्याच्याजवळ लाइफलाइनही उरलेली नव्हती, त्यामुळे त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. चंद्र प्रकाशने जॅकपॉट प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि तो एक कोटी रुपये घेऊन घरी गेला.

“लेडीज बारमध्ये काम करणारी अत्यंत सुंदर बाई साहेबांना भेटायला यायची”, ‘धर्मवीर २’चे निर्माते मंगेश देसाईंनी सांगितला आनंद दिघेंबद्दलचा प्रसंग

सात कोटींसाठी विचारलेला प्रश्न कोणता?

सात कोटी रुपयांसाठी त्याला विचारण्यात आलेला जॅकपॉट प्रश्न असा होता की १५८७ मध्ये उत्तर अमेरिकेत इंग्रजी पालकांच्या पोटी जन्मलेले पहिले नोंदणी केलेले मूल कोणते होते?

त्याचे ऑप्शन, ए – व्हर्जिनिया डेअर, बी – व्हर्जिनिया हॉल, सी- व्हर्जिनिया कॉफी आणि डी – व्हर्जिनिया सिंक हे होते.
या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे व्हर्जिनिया डेअर होते. याचे उत्तर माहीत नसल्याने चंद्रप्रकाशने खेळ सोडला.