Charu Asopa with Ex Husband Rajeev Sen: टीव्ही अभिनेत्री चारू असोपा व सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन यांनी २०१९ मध्ये प्रेम विवाह केला होता. पण लग्नानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी आल्या. दोघांनी त्या सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण अखेर त्यांचा वर्षभरापूर्वी घटस्फोट झाला. मात्र, घटस्फोटानंतरही चारू असोपा-राजीव सेन अनेकदा एकत्र दिसतात. चारू व राजीव यांना मुलगी असून तिचं नाव झियाना आहे.
चारू व राजीव मुलीला घेऊन व्हेकेशनला जातात, इतकंच नाही तर घटस्फोटानंतरही राजीवच्या कुटुंबाशी चारूचे चांगले संबंध आहेत. आता पुन्हा एकदा राजीव व चारू एकत्र सेलिब्रेशन करताना दिसले. नुकताच राजीव सेनने त्याच्या आईचा ७३ वा वाढदिवस साजरा केला. राजीव सेनने त्याच्या आईचा वाढदिवस पूर्वाश्रमीची पत्नी चारू असोपाबरोबर साजरा केला. दोघांनीही पार्टीत खूप धमाल केली.
राजीवने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. चारू तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि सासूसोबत खूप एंजॉय करत असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. या वाढदिवसाच्या पार्टीत चारू तिची मुलगी झियानासह आली होती. या वाढदिवसाच्या पार्टीत सुश्मिता, तिच्या दोन्ही मुली रेने व अलीसा, तसेच सुश्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलही उपस्थित होता.
चारू असोपाने राजीवच्या आईला इन्स्टाग्रामवर पोस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील चारू व राजीव सेन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, यात ते राजीवच्या आईबरोबर पोज देत आहेत. तिघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत. आता या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहते त्यांना पुन्हा लग्न करण्याचा सल्ला देत आहेत.
राजीव -चारूचा तीन वर्षांत झाला घटस्फोट
सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर लेक झियानाला घेऊन चारू वेगळी राहत आहे. पण अनेकदा राजीव व चारू दोघेही लेकीसाठी एकत्र दिसतात. राजीव व चारूने २०१९ मध्ये लग्न केलं, काही महिन्यांनंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले होते. अखेर चारू व राजीव यांचा २०२३ मध्ये घटस्फोट झाला.