अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन मागच्या काही महिन्यांपासून खूप चर्चेत आहे. राजीव आणि त्याची पत्नी चारु असोपामध्ये झालेला वाद सर्वश्रुत आहे. दररोज या प्रकरणाशी निगडीत नवनवीन माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी राजीवने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या करण मेहराचे चारुबरोबर अफेअर सुरु आहे असे म्हटले होते. या आरोपांवर करणने प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीमध्ये त्याने “राजीव मूर्खपणा करत आहे.माझा चारु असोपासह कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. आम्ही फार वर्षांपूर्वी एकत्र काम केले होते. त्यानंतर आमचा संपर्क तुटला होता”, असे म्हटले होते. तेव्हा ‘खोटे आरोप केल्याबद्दल राजीववर मानहानीचा दावा ठोकणार आहे’, असे वक्तव्यही करणने केले होते. करणनंतर आता चारुने या आरोपांचे खंडन करत स्वत:ची बाजू मांडली आहे.

आणखी वाचा – “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “तो (राजीव) जरा काहीही बडबडत राहिला, तर त्याच बोलणं कोणी ऐकणार नाही हे त्याला पक्क झालंय. म्हणून तो आता मुद्दामुन नाव घेऊन बोलायला लागलाय. माझं इन्स्टाग्राम अकाऊंट स्क्रोल करुन त्याने हा व्हिडीओ शोधला आणि लगेच करणवर आरोप करायला सुरुवात केली. एका कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये करण आणि मी एकत्र आलो होतो. कार्यक्रमामध्ये पोहचल्यावर तो येथे आमंत्रित आहे हे मला कळले होते. तेव्हा आम्ही कामासाठी भेटायचो.”

आणखी वाचा – Video : मान पकडली, टी-शर्ट खेचलं, बराच वेळ अंगावर बसली अन्…; अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

ती पुढे म्हणाली, “कार्यक्रमामधल्या त्या व्हिडीओला त्याला टॅग करणं मला भाग होतं. हा व्हिडीओ पाहून राजीवने करणवर आरोप करायला सुरुवात केली. एखाद्याला कारण नसताना त्रास देणं नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. सध्या करण त्याची वेगळी लढाई लढत आहे. राजीवचे हे कृत्य चुकीचे आहे. मी ठरवलं असतं, तर मीसुद्धा दुसऱ्यांच्या नावांचा वापर करत त्याला त्रास देऊ शकले असते. पण मी तसं करणार नाही. एका मुलीसाठी तिचे चारित्र्य किती मौल्यवान असते हे मला ठाऊक आहे.”

Story img Loader