Chhota Pudhari mother on his Friendship with Nikki: छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडे सध्या ‘बिग बॉस मराठी’मुळे (Bigg Boss Marathi 5) चर्चेत आहे. बिग बॉस मराठीत निक्की तांबोळी व घनश्याम दरवडे यांच्या मैत्रीची खूप चर्चा आहे. त्यांचे व्हिडीओही खूप व्हायरल होत आहेत. घनश्याम घरात काही स्पर्धकांवर चिडतानाही दिसतोय, यावर आता त्याच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घनश्याम ‘बिग बॉस मराठी’मध्ये गेला याचा त्याच्या कुटुंबाला खूपच आनंद आहे. घनश्यामने शोमध्ये जाण्याआधी कोणतीही तयार केली नव्हती असं त्याच्या वडिलांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. घनश्याम व निक्की ज्या टीमबरोबर खेळतायत त्यांच्याबरोबर राहतील का? असा प्रश्न विचारल्यावर त्याची आई अलका दरवडे म्हणाल्या, “ज्या टीमबरोबर खेळतोय त्यांच्याबरोबर राहील की नाही ते आता आम्हाला तरी काय सांगता येणार. पण मला तरी वाटतंय की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. निक्की व घनश्याम हे बहीण-भावंडाचं प्रेम आहे, लोकांना उगाचच इश्यू वाटतोय.”

अरबाज पटेल झाला नवा कॅप्टन! पण, कौतुक होतंय ‘गुलीगत धोका’ म्हणणाऱ्या सूरज चव्हाणचं! नेमकं काय घडलं?

पुढे त्या म्हणाल्या, “आम्ही आता शेतकरी कुटुंबातले आहोत. टीम म्हटल्यावर आम्ही रानात कामाला जायचो, चार बायांची टोळी इकडे जायची, चार बायांची तिकडे व्हायची. त्यामुळे टीम करणं हे शेतकऱ्याच्या घरातूनच त्याच्यात आलंय. तो लहान आहे, त्याला वाटतं ही आपल्या बाजूला आहे, मग तो दुसऱ्या बाजूच्या माणसावर चिडतोय, दुसऱ्याला वाटतं घनश्याम जरा चिडकाच आहे. मी एक आई म्हणून आत्मविश्वासाने सांगते जेवढा तो चिडका व कडक दिसतो, तेवढाच तो नारळाच्या पाण्यासारखा गोड आहे. त्याच्यात चिडखोरपणा आहे, पण ते टीम केल्यामुळे लोकांना वाटतं की घनश्याम चार लोकांशी असा वागतोय किंवा चार लोकांशी तसा वागतोय, पुढाऱ्याने असं वागलं नाही पाहिजे, पण तो अजुन लहान आहे.”

 “शिवाली हे खरंय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; सोबतीला श्रमेशला पाहून नेटकरी म्हणाले…

मुलाबद्दल बोलताना अलका दरवडे भावुक झाल्या, त्यांनी लोकांची माफी मागितली. “घनश्यामला गावापासून ते राज्यापर्यंत लोकांना पाठिंबा आहे. त्याच्या पाठीवर लोकांचा असाच हात राहो, माझा मुलगा लहान आहे, त्याचं वय-उंची नाही, त्यामुळे लोकांनी त्याच्या एकाही शब्दाचा राग धरू नये, एवढंच मी सांगते. बिग बॉसमध्ये तो काही लोकांवर चिडतोय, पण माझ्या मुलाच्या वतीने मी माफी मागते, त्याला समजून घ्या. देवाने संधी दिली आहे तर त्याला तुमच्याबरोबर खेळू द्या,” असं अलका दरवडे रडत म्हणाल्या.

बिग बॉस संपल्यानंतर निक्कीला घरी बोलावणार का? असं विचारल्यावर घनश्यामची आजी म्हणाल्या, “परमेश्वराने तिला सुचवलं आणि आली किंवा आमच्या नातवाने तिला आणलं तर छानच आहे.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhota pudhari mother reaction on ghanshyam friendship with nikki in bigg boss marathi hrc