छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध बालकलाकार म्हणून मायरा वायकुळला ओळखले जाते. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने परी हे पात्र साकारलं होतं. या पात्राने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. सध्या मायरी ही ‘नीरजा- एक नई पहचान’ या मालिकेत झळकत आहे. त्यातच आता तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

मायरा वायकुळ ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिने “ग्रेट भेट मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री एकनाथ शिंदे साहेब”, असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “नाचणीची भाकरी, मच्छी फ्राय अन्…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने चुलीवर बनवलं जेवण, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…
Reshma Shinde Wedding Video writes special kannda msg
Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेसेज, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…
DCM Eknath Shinde first Reaction
Eknath Shinde: “आधी मी CM म्हणजेच ‘कॉमन मॅन’ होतो, आता DCM…”, शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
Chhagan Bhujbal On Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदेंच्या नाराजीवर छगन भुजबळांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्रीपद गेलं आणि…”

या व्हिडीओत एकनाथ शिंदे मायराची विचारपूस करताना दिसत आहेत. त्यानंतर मायराही त्यांना वाकून पायाला हात लावून नमस्कार करताना पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच मायरा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फोटो काढताना दिसत आहे.

त्याबरोबरच मायरा ही देवीचे दर्शन घेताना आणि प्रसाद घेतानाही पाहायला मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी तिच्या कृतीचे कौतुक केले जात आहे. मायराच्या व्हिडीओवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. “ताई, मायराला संस्कार खूप छान दिलेत”, अशी कमेंट अनेकांनी यावर केली आहे.

आणखी वाचा : “…म्हणून मी अभिषेक जावकरशी लग्न केले”, अखेर प्रार्थना बेहेरेने उघड केले गुपित

दरम्यान मायरा सध्या कलर्स वाहिनीवरील ‘नीरजा- एक नई पहचान’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती नीरजा हे पात्र साकारत आहे. या मालिकेत अभिनेत्री स्नेहा वाघ, काम्या पंजाबी झळकताना दिसत आहे.

Story img Loader