अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता चिन्मय मांडलेकरचं सध्या ‘गालिब’ हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केलं असून अभिनेत्री गौतमी देशपांडे व अभिनेता विराजस कुलकर्णी यांनी या नाटकात प्रमुख भूमिका साकारली आहे. चिन्मयच्या ‘गालिब’ नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच चिन्मयने आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. तब्बल १५ वर्षांनंतर अभिनेता आता ‘स्टार प्रवाह’साठी काम करणार आहे. यासंदर्भात नुकतीच चिन्मयने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काळात काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अलीकडेच गणेशोत्सवानिमित्ताने पार पडलेल्या ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ सोहळ्यात नव्या मालिकेच्या टीमची ओळख करून देण्यात आली. तसंच याच दिवशी नव्या मालिकांचे प्रोमो देखील समोर आले. अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री मयुरी कापडणे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘उदे गं अंबे’ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर अभिनेत्री निवेदिता सराफ व मंगेश कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. याचं नव्या मालिकेसाठी अभिनेता चिन्मय मांडलेकर काम करणार आहे.

आई आणि बाबा रिटायर होत आहेत! (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)

हेही वाचा – “विजेता आधीच ठरलेला असतो”, ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील स्पर्धकाचे वक्तव्य, म्हणाला…

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेचा प्रोमो शेअर करून चिन्मयने लिहिलं आहे की, जवळ जवळ पंधरा वर्षांनी स्टार प्रवाहसाठी मलिका लिहितोय. तुम्हाला आवडेल अशी आशा! चिन्मयच्या या पोस्टवर त्याची पत्नी नेहा मांडलेकरने प्रतिक्रिया दिली आहे. “जोरदार होऊ दे”, असं ती म्हणाली आहे.

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाणार का? गौतमी पाटीलने दोन शब्दात दिलं उत्तर, सूरज चव्हाणला शुभेच्छा देत म्हणाली…

हेही वाचा – “बहुजन समाजातून आल्याने…”, शाहीर साबळेंच्या जयंतीनिमित्ताने नातू केदार शिंदेंनी खास पोस्ट लिहित व्यक्त केली खंत

दरम्यान, याआधी चिन्मय मांडलेकरने बऱ्याच मराठी मालिकांसाठी लेखन केलं आहे. ‘असंभव’, ‘वादळवाट’, ‘तू तिथे मी’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘जीव झाला येडापिसा’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘तू माझा सांगाती’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकांसाठी कथा आणि पटकथा लेखणाचं काम चिन्मयने केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinmay mandlekar come back on star pravah as writer after 15 years pps