Chota Pudhari Ghanshyam Darode & Nikki Tamboli : छोटा पुढारी घन:श्याम आणि निक्की तांबोळी या भावा-बहिणीची जोडी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे घराघरांत चर्चेत आली. पहिल्या दिवसापासून निक्की, अरबाज, घन:श्याम ही मंडळी एका टीममधून गेम खेळली. शो संपल्यावर छोटा पुढारी निक्की-अरबाजला भेटण्यासाठी खास मुंबईत सुद्धा आला होता. यावेळी त्याने निक्की-अरबाजला आपल्या वाढदिवसाचं निमंत्रण दिलं होतं.

निक्की-अरबाजने व्हिडीओ शेअर करत, “आम्ही २५ डिसेंबरला घन:श्यामच्या वाढदिवशी त्याच्या घरी जाणार, त्याच्या कुटुंबीयांना भेटणार” असं सांगितलं होतं. पण, प्रत्यक्षात हे दोघंही त्याच्या वाढदिवसाला उपस्थित राहिले नव्हते. फक्त जान्हवी किल्लेकर आणि पुरुषोत्तमदादा पाटील हे दोन सदस्य घन:श्यामच्या वाढदिवसाला उपस्थित होते. याबद्दल स्वत: छोटा पुढारीने व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. आता नुकत्याच ‘लेट्सअप’ मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा त्याने याबद्दल भाष्य केलं आहे.

bigg boss marathi jahnavi killekar visit suraj chavan hometown
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Shiva
“शिवाच्या एरियात येऊन पोरींना छेडणार…”, शिवा तिच्या जुन्या स्टाईलमध्ये पुन्हा दिसणार; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “लय भारी”
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
Bigg Boss 18 Vivian Dsena crying after seeing wife nouran aly
Bigg Boss 18: पत्नीला पाहताच विवियन डिसेनाचे अश्रू अनावर; दोघांचा रोमँटिक प्रोमो पाहून निक्की तांबोळी म्हणाली…
Ruturaj Gaikwad Speaks About Controversial Decision of Ankit Bawne Catch Out in the Ranji Trophy Game Between Services and Maharashtra
Ruturaj Gaikwad: “अपील करायला लाज वाटली पाहिजे…”, ऑस्ट्रेलियातून महाराष्ट्रासाठी धावून आला ऋतुराज गायकवाड, रणजीमधील कॅचचा व्हीडिओ केला शेअर
Neelam Kothari admits she wanted to kill Chunky Panday
“त्याचा जीव घ्यावासा वाटत होता”, शूटिंगदरम्यान चंकी पांडेच्या ‘त्या’ कृतीवर भडकलेली नीलम कोठारी; म्हणाली, “तो मला…”

हेही वाचा : Video : आशा भोसले यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी ‘तौबा तौबा’ गाणे गात धरला ठेका, केली विकी कौशलची प्रसिद्ध हूकस्टेप

घन:श्याम निक्कीबद्दल काय म्हणाला?

छोटा पुढारी घन:श्याम ( Chota Pudhari ) म्हणाला, “माझ्यापेक्षा सर्व चाहत्यांना जास्त खात्री होती की, निकू ताईला आमंत्रण नसलं तरीही, ती घन:श्यामच्या वाढदिवसाला नक्की येणार… आणि निक्की तांबोळी दिलेल्या शब्दाची किती पक्की आहे हे अख्ख्या जगाला माहिती होतं. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मी घन:श्यामच्या वाढदिवसाला जाणार, त्याच्या घरच्यांना भेटणार असं सांगितलं होतं. पण, आता मला माझे चाहते विचारतात, तुमची निकू ताई कुठे आहे? जान्हवी ताई एकट्याच वाढदिवसाला आल्या होत्या.”

“निकू ताईला १०-१० फोन केले तरीही त्यांना येता आलं नाही. अरबाज पटेल कुठेय? तो सुद्धा वाढदिवसाला आला नाही. हे मलाच नाहीतर माझ्या सगळ्या चाहत्यावर्गाला सुद्धा खटकलेलं आहे. निकू ताईने मला धोका दिला असं म्हणता येणार नाही… पण, तिचं भावावरचं प्रेम किती आहे हे स्पष्टपणे दिसलं. बहीण-भावाचं खरं नातं फक्त घन:श्याम निभावतोय. मी शब्दाचा खूप पक्का आहे… मी एकदा दिलेला शब्द परत घेत नाही. आता ती भावाच्या कार्यक्रमाला जाणूनबुजून आली नाही का? हे तिचं तिला माहिती…” असं मत व्यक्त करत घनश्यामने ( Chota Pudhari ) घडल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Video : “त्या रस्त्यावर बसलेल्या नाहीत…”, प्राजक्ता माळीबाबतच्या विधानावरून मेघा धाडे संतापली; म्हणाली, “तू घाबरून जाऊ नकोस”

दरम्यान, जान्हवी किल्लेकर आणि पुरुषोत्तमदादा पाटील ठरल्याप्रमाणे वाढदिवसाला हजर राहिल्याने छोटा पुढारीने त्यांचे आभार मानले आहेत. निक्की-अरबाजप्रमाणे सूरज देखील घन:श्यामच्या ( Chota Pudhari ) वाढदिवसाला उपस्थित राहिला नव्हता.

Story img Loader