बिग बॉस हिंदीच्या १८ व्या पर्वाचा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. १५ आठवड्याच्या प्रवासानंतर बिग बॉसची ट्रॉफी अभिनेता करणवीर मेहराने जिंकली. करणवीर ट्रॉफी जिंकल्याने सर्वात जास्त आनंदी त्याची खास मैत्रीण चुम दरांग आहे. मूळची अरुणाचल प्रदेशची चुम बॉलीवूड अभिनेत्री आहे. चुम बिग बॉसच्या ग्रँड फिनालेनंतर घरी पोहोचली. तिच्या कुटुंबियांनी केक कापून चुम हिच्या ग्रँड फिनालेपर्यंतच्या प्रवासाचं सेलिब्रेशन केलं.
चुम दरांग ही ‘बिग बॉस 18’ ची फायनलिस्ट होती, पण फिनालेमध्ये पोहोचूनही तिला ट्रॉफी जिंकता आली नाही. चुम ‘बिग बॉस 18’ च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये होती आणि पाचव्या क्रमांकावर तिचा प्रवास संपला. शोमधून बाहेर पडल्यानंतर चुमने करणने शो जिंकावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. करण या शोचा विजेता ठरला. बिग बॉसच्या प्रवासामध्ये देशभरातील लाखो लोकांची मनं जिंकणाऱ्या चुम दरांगच्या कुटुंबाने तिचे जल्लोषात स्वागत केले. अभिनेत्रीने घरी गेल्यावर केलेल्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सुरुवातीपासून बिग बॉस १८ चा भाग असलेली चुम दरांग १०५ दिवस तिच्या कुटुंबापासून दूर होती आणि अखेर १९ जानेवारीला १०५ दिवसांचा प्रवास पूर्ण करून ती आपल्या कुटुंबाजवळ परतली, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तिचे कुटुंबीयही खूप आनंदी होते. कुटुंबियांनी तिचं प्रेमाने स्वागत केलं. चुम हिने कुटुंबातील सर्व सदस्यांबरोबर केक कापतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
“माझा प्रवास इतका अविस्मरणीय बनवल्याबद्दल सर्वांचे आभार. मी प्रत्येकाची आभारी आहे,” असं कॅप्शन चुमने या व्हिडीओला दिलं. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पाहा व्हिडीओ –
चुम दरांगने बिग बॉस 18 मध्ये तिच्या साधेपणाने लोकांची मनं जिंकली. तिचा प्रामाणिकपणा प्रेक्षकांना फार भावला. घरात तिची शिल्पा शिरोडकर, करणवीर मेहरा व श्रुतिका अर्जुन यांच्याशी खूप घट्ट मैत्री झाली.