सुप्रसिद्ध मराठी गायक, संगीतकार अवधूत गुप्तेची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. यामागचं कारणही तितकंच खास आहे. दहा वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर त्याचा प्रदर्शित झालेला ‘खुपते तिथे गुपते’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या आजही आठवणीत आहे. त्याचा हाच कार्यक्रम पुन्हा एकदा छोट्या पडद्याद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यानचे काही प्रोमो झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये अवधूत राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळींशी संवाद साधताना दिसणार आहे. यादरम्यानचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावताना दिसणार आहेत. तर दुसऱ्या भागामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावताना दिसतील.
एकनाथ शिंदे यांचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अवधूत त्यांना एक वेगळा आणि हटके प्रश्न विचारताना दिसत आहे. “स्पेशल कॉल करण्याची संधी दिली तर कोणाला कॉल करणार बाळा साहेबांना की दिघे साहेबांना?”. या प्रश्नावर एकनाथ शिंदे अगदी हसत उत्तर देताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
आणखी वाचा – गरोदरपणात सुप्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागतोय ‘या’ आजाराचा सामना, आता ‘अशी’ झाली आहे अवस्था
पाहा व्हिडीओ
ते म्हणतात, “अरे अवधूत कॉन्फरन्स कॉल केला तर चालेल का? मला दोघांशीही बोलायचं आहे”. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा ‘खुपते तिथे गुपते’मधील दुसरा भाग अधिक रंगतदार होणार असं या व्हिडीओमधून दिसून येत आहे. येत्या ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.