Colors Marathi Aai Tulja Bhawani Serial Episode : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ३ ऑक्टोबरपासून ‘महाराष्ट्राची कुलस्वामिनी : आई तुळजाभवानी’ ही मालिका सुरू झाली. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या ‘आई तुळजाभवानी’ देवीची गाथा प्रेक्षकांसमोर उलगडण्यात येत आहे. यामुळे पुढच्या भागात काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली असते.

‘आई तुळजाभवानी’ मालिकेच्या पहिल्याच प्रोमोला ( Colors Marathi ) प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. प्रोमोमधील जबरदस्त VFX, थरार, मांडणी या गोष्टींचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं होतं. या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, या मालिकेच्या आजच्या ( २४ ऑक्टोबर २०२४ ) एपिसोडचं प्रसारण तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आलं आहे. याबद्दल प्रेक्षकांनी विचारपूस केल्यावर वाहिनीने यावर पोस्ट शेअर करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
sairaj kendre and his mom got emotional
Video : लाडक्या लेकाची दिवाळी सुट्टी संपली…; ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील छोट्या सिम्बाच्या आईला अश्रू अनावर

हेही वाचा : तांबडी चामडी चमकते उन्हात…; जिनिलीया अन् रितेश देशमुखचा मित्रमंडळींसह जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

९ वाजता मालिका सुरू झाल्यावर वाहिनीकडून पुन्हा एकदा कालचा भाग दाखवण्यास सुरुवात करण्यात आली. यावर नेटकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. “नवीन एपिसोड दाखवा… कालचा एपिसोड दाखवत आहात”, “नवीन भाग दाखवा आम्ही एवढा वेळ वाट बघतो आणि तुम्ही पुन्हा तोच भाग प्रसारित करता मूड ऑफ” अशा कमेंट्स वाहिनीच्या पोस्टवर आल्या होत्या. यानंतर नेमकं काय घडलंय याचं स्पष्टीकरण ‘कलर्स वाहिनी’कडून ( Colors Marathi ) देण्यात आलं आहे.

Colors Marathi
कलर्स मराठीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Colors Marathi )

तांत्रिक कारणांमुळे कालचा भाग दाखवला…

“काही तांत्रिक कारणांमुळे तुमच्या आवडत्या मालिकेचा ‘आई तुळजाभवानी’चा कालचा भाग आज दाखवण्यात आला. उद्यापासून मालिका नियमितपणे दररोज रात्री ९ वाजता प्रसारित होईल. गैरसोयीबद्दल क्षमस्व!” अशी पोस्ट शेअर करत ‘कलर्स मराठी’ने आजचा भाग प्रसारित न झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Video : “नुसतं प्रेम भावा…”, म्हणत परदेसी गर्ल पोहोचली कोल्हापुरात! घरी येताच धनंजय पोवारच्या आई अन् पत्नीने औक्षण

हेही वाचा : काय गं सखू, बोला दाजिबा! दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर प्रथमेश परबचा मॉडर्न अंदाज; सोबतीला आहे पत्नी, पाहा व्हिडीओ

दरम्यान, ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत ( Colors Marathi ) अभिनेत्री पूजा काळे मुख्य भूमिका साकारत आहे. पूजा काळे ही भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तसेच अभिनेत्रीने कथकचंही शिक्षण घेतलं आहे. या मालिकेच्या निमित्ताने पूजाने मालिका विश्वात पदार्पण केलं आहे.

Story img Loader