Colors Marathi New Serial : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’ हा शो सुरू झाला. या कार्यक्रमाला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वीच्या चार पर्वांपेक्षा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला पहिल्याच आठवड्यात ऐतिहासिक टीआरपी मिळाला आहे. अशातच वाहिनीने आणखी एक आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे. ही बातमी म्हणजे लवकरच ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर आणखी एक नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आता यामध्ये कोणते कलाकार झळकणार याबद्दल जाणून घेऊया…

‘कलर्स मराठी’ ( Colors Marathi ) वाहिनीवरील नव्या मालिकेत आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या मुलीची कथा दाखवली जाणार आहे. या नव्या मालिकेचं नाव ‘दुर्गा’ असं आहे. मालिकेच्या प्रोमोची सुरुवात दुर्गाच्या एन्ट्रीने होते… तिला वडील नसतात, तर आईची स्मृती हरपल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. दुर्गा तिच्या बाबांच्या फोटोकडे पाहून प्रतिशोध घेण्याचा निर्धार करते. यानंतर दुर्गा अभिषेकला जाऊन धडकते. अर्थात, अनन्याच्या प्रतिशोधासाठीच दुर्गा अभिषेकला भेटते असा अंदाज प्रोमो पाहून येत आहे. आता एकटी दुर्गा एवढ्या बलाढ्य कुटुंबाचा सामना कसा करणार या गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होईल.

loksatta lokankika competition
लोकसत्ता लोकांकिका : विभागीय अंतिम फेरीसाठी सहा संघांची निवड, आपल्या भागातील विषय मांडणीला प्राधान्य
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Savalyachi Janu Savali Fame Prapti Redkar Dance on angaaron song of pushpa 2 movie
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरचा ‘पुष्पा २’मधील ‘अंगारो’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : एलिमिनेशनपासून सुटका! सगळे झाले ‘सेफ’ पण, रितेश देशमुखने सांगितला मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं?

मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार

‘दुर्गा’ या नव्या मालिकेत कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारतील याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली आहे. यापूर्वी ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत झळकलेला अंबर गणपुळे ‘दुर्गा’ मालिकेत अभिषेकचं पात्र साकारणार आहे. तसेच ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत झळकलेली रुमानी खरे आता ‘दुर्गा’ मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारेल. याशिवाय शिल्पा नवलकर आणि राजेंद्र शिसटकर यांची झलक सुद्धा या नव्या मालिकेत पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : सुप्रिया पाठारेंनी शेअर केला लग्नातील Unseen फोटो अन् लिहिलं सुंदर कॅप्शन! मराठी कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस

Colors Marathi
नवीन मालिका दुर्गा ( Colors Marathi )

‘कलर्स मराठी’च्या ( Colors Marathi ) या नव्या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ऋजुता देशमुख, रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, शिवानी सोनार, सलील कुलकर्णी, आदिश वैद्य यांनी कमेंट्स करत रुमानी आणि अंबर यांना नव्या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता ही नवीन मालिका किती वाजता अन् कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची माहिती लवकरच वाहिनीकडून दिली जाणार आहे.

Story img Loader