गेल्या काही महिन्यांपासून ‘कलर्स मराठी’ नवनवीन मालिका, कार्यक्रमांची घोषणा करत आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजे २२ एप्रिलला स्पृहा जोशी व सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली ‘सुख कळले’ मालिका सुरू झाली. या मालिकेला सुरू होऊन आठवडा पूर्ण होताच ‘कलर्स मराठी’ने नव्या मालिकेची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच ‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ‘अंतरपाट’ असं नव्या मालिकेचं नाव आहे. “नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने धरला दुराव्याचा अंतरपाट,” असं कॅप्शन लिहित कलर्सने नव्या मालिकेचा पहिला-वहिला प्रोमो शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: क्रांती रेडकरने जुळ्या मुलींच्या टोपण नावामागची सांगितली गोष्ट; एकीच्या नावाचा संबंध आहे झाशीच्या राणीशी तर दुसरीचा…

प्रोमोमध्ये हळदीचा समारंभ पाहायला मिळत आहे. लव्ह मॅरेजच्या काळात अ‍ॅरेंज मॅरेज होतं असल्याचं मालिकेची नायिका सांगत आहे. एकाबाजूला आनंद दिसत आहे. पण दुसऱ्या बाजूला निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळत आहे. नवरा मुलगा बेडवर चिंतेत पडलेला दिसत आहे. त्यामुळे आता नशिबाने मांडलेला हा लग्नाचा घाट कसा पार पडतो आणि मग त्यानंतर काय होतं? हे पाहणं रंजक असणार आहे.

‘अंतरपाट’ या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री रश्मी अनपट आणि अभिनेता अशोक ढगे झळकणार आहेत. याशिवाय अभिनेत्री रेशम टिपणीस, तृष्णा चंद्रत्रे असे बरेच कलाकार पाहायला मिळणार आहेत. सध्या ‘अंतरपाट’ मालिकेचा पहिला-वहिला प्रोमो चर्चेत आला असून इतर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. प्रोमोचं कौतुक केलं जातं आहे.

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रींचा ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या टीमबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video : ‘नाच गं घुमा’ गाण्यावर स्वप्नील जोशीच्या मुलांचा डान्स! व्हिडीओवर मुक्ता बर्वेसह नम्रता संभेरावने केली खास कमेंट

दरम्यान, ‘कलर्स मराठी’ची ‘अंतरपाट’ आगामी मालिका कन्नड मालिकेचा रिमेक आहे. ‘कलर्स कन्नडा’वरील ‘अंतरपाटा’ या लोकप्रिय मालिकेचा रिमेक नवीन मालिका आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors marathi announces new serial antarapaat coming soon pps